
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर
अहमदपूर येथील भिमनगर येथे एका आयोजित कार्यक्रम करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे उदिष्ट असे की गेल्या तीन महिन्यापासुन दररोज भिमनगर अहमदपुर येथे ‘बुद्ध ग्रंथ’ वाचन घेण्यात आले. यात दररोज आयु.अंजली अरुण वाघंबर यांनी बुद्ध ग्रंथ वाचन केले.व आयु.शेषेराव मानाजी ससाणे सर यांनी उपस्थितानां धम्मोपदेश केला. आयु.ससाणे सर यांनी सांगीतले की, डाॅ.संजय भाऊसाहेब वाघंबर यांनी पण वेळात वेळ काढून ‘बुद्ध ग्रंथ’ वाचन ऐकण्यासाठी उपस्थित राहीले. ‘बुद्ध ग्रंथ’ ग्रंथाच्या वर्षावास समारोप कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयु.अंजली वाघंबर यांनी बुद्ध वंदना घेतली व उपस्थित नागरिकांना धम्माच्या 22(बावीस) प्रतिज्ञाची शपथ दिली. या वेळी सर्वांनी ऊभे राहुन मोठया आवाजात प्रतिज्ञाचे वाचन केले. या आवाजाने आजुबाजुचा परिसर दुमदुमला.या नतंर ग्रंथ वाचन ऐकण्यासाठी सतत उपस्थित राहीलेल्या मुलींनी व महिलांनी मंगलसुत म्हण्टले व धम्म गाथा गायिल्या. भिमनगर वासीयांच्या वतीने आयु.अंजली अरुण वाघंबर व अरुणभाऊ वाघंबर तसेच आयु.अंजलीबाई शेषेराव ससाणे व आयु.शेषेराव ससाणे सर यांचा कपडे रुपी आहेर देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या आयु.भारती श्रीकांत बनसोडे यांनी ‘बुद्ध ग्रंथ’ वाचन ऐकण्यासाठी सतत उपस्थित राहीलेल्या महिलांना साडी वाटप व मुलीनां वह्या चे वाटप केले. या ‘बुद्ध ग्रंथ’ वाचनाच्या कार्यक्रमाला आयु. महेन्द्र ससाणे यांनी स्वखर्चाने तीन महिन्यासाठी विहाराला जागा उपलब्ध करून दिली.त्याने केलेल्या धम्म सहकार्या बध्दल त्याच्या अनुपस्थितीत त्याची पत्नी आयु.सुरेखा ससाणे हिचा सत्कार करण्यात आला. आयु.शेषेराव ससाणे सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय बौध्द महासभेचे आयु.शेषेराव बनसोडे सर यांच्या नावाला कार्यक्रमाचे ‘अध्यक्ष’ म्हणून अनुमोदन दिले.या कार्यक्रमाला विशेष अतिथि म्हणून उदगीरहुन बौध्द महासभेचे आयु. डोरनाळीकर सर तसेच सुप्रियभाऊ बनसोडे,डाॅ.संजय वाघंबर,धम्म उपदेशिका आयु.सुमन लामतुरे,सौ. शाहुताई काबंळे ,जीवन गायकवाड यांची पण उपस्थिती होती. वरील सर्व मान्यवरांचा भिमनगर वासीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. वरील कार्यक्रमाचे सुत्रस॔चलन करण्याचे काम अतुल ससाणे यांनी केले. हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आयु.सुजाता उत्तम तिगोटे मॅडम यांच्या तर्फे खिचड़ी वाटप व आयु.शंकुतलाबाई सुधाकर बनसोडे यांच्या तर्फे खीर वाटप करण्यात आली.तसेच आयु.शिला शिंदे यांनी पिण्याच्या पाण्याचे वाटप केले.