
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
किनवट:-तालुक्यातील बहुतांश भागात मागील आठ दिवसापासूनअधुन मधुन सरी कोसळत होत्या.अतिवृष्टितुन शिल्लक राहीलेले सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले पिक काढणीची लगबग चालुअसतानाचंअचानक पाऊस पडलाआहे.त्यात दिनांक:१२ रोजी दुपारी अचानक ढगफुटी सदृश्य पावसाने तर शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतला.त्यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले.परिणामी शेतकरी चिंतेतआहेत.यंदा पेरणीनंतर पावसाने मोठा खंड दिला.त्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी झाली.त्यातून जे पीक वाचले त्याला नंतर अतिवृष्टीचा फटका बसला.या दोन्ही संकटातून थोडेफार पीक हातीआले होते.त्यातून काही प्रमाणात लागवड खर्च निघून नुकसान कमी होईल,अशीआशा होती.पण ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा या पिकांना मोठा फटका बसलाआहे.ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून त्याची गंजी शेतात लावून ठेवली होती.त्या शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाला झाकताना मोठी तारांबळ उडाली आहे.अनेकांच्या पिकात पाणी साचल्यानेआता सोयाबीन काढणीस अडथळाआला आहे.परिणामी, शेतकरीअतिचिंतेतआहेत.शेंगांणा कोंब फुटण्याची भीती सोयाबीनच्या शेंगा वाळल्याआहेत.काहींना मजुराअभावी सोयाबीन पीक काढताआले नाही. त्यामुळे शेतातच असलेल्या या वाळलेल्या सोयाबीन शेगांना या पावसामुळे कोंब फुटू शकतात.तसे झाले तर काहीच पीक हातात येणार नाही.अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.दि.१२रोजी बुधवारी दुपारी १:००वाजता किनवट शहरासह परिसरात मांडवी सारखणी बोधडी जलथरा शिवणी आप्परापेठ इस्लापुर कोस्मेट भिसी मेघगर्जनेसह विजेंच्या कडकडाटासह दोन तास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.त्यानंतर ही गुरुवारीही पाण्याची रिपरिप सुरूच होती.त्यानंतरही काहीवेळा रिमझिम पाऊस सुरूचंआहे.मागील चार-पाच दिवसांपासून तालुक्यात कोठेना कोठे रोजचं जोरदार पाऊस पडत आहे. एक दिवस पावसाने विश्रांती घेतली. तोच बुधवारी पुन्हा पाऊस झाला. शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहून गेले.अचानकआलेल्या पावसामुळे काहीवेळ शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.भाजीपाला विक्रेते,पथारीवाले यांची चांगलीच तारांबळ उडाली.ग्रामीण भागात ओढ्या-नाल्यांना पूरआला होता. शेतीच्या कामांना व्यत्ययआलाआहे. उभ्याअसलेल्या सोयाबीनचा रानात मुसळधार पाण्यामुळे तलावाचे स्वरूप दिसून येतआहे.या सर्व बाबींमुळे आमचे जगणे मुश्कील झाले असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जातआहे.