
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा शहरातील प्रसिद्ध युवा नेते तथा पत्रकार माधव भाऊ पांचाळ प्रदेश सचिव विश्वकर्मा विराट संघ महाराष्ट्र उद्योग आघाडी भाजप विभागीय अध्यक्ष यांनी अनोखा व आदर्श सामाजिक उपक्रम राबवत आपल्या मुलीगी तन्वी माधव पांचाळ हिच्या वाढदिवसानिमित्त होणारा
अनावश्यक खर्च टाळून
शहरातील श्रीनिवास मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या डॉ. हेलन केलर अंध विद्यालयातील विद्यार्थीनीं गायन वादन करत व केक कापुन वाढदिवस साजरा केला.यावेळी विद्यालयातील अंध विद्यार्थ्यांना व विविध क्षेत्रातील ४५० मान्यवर मंडळींना भोजनाची व्यवस्था करण्यात आली. वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या वाढदिवसाला तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांसह न पा चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी,मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, वनविभाग वनपाल अशोक क्यादरवाड,परमेश्वर घुगे, वनरक्षक लक्ष्मण पाटील शेळके, करीम शेठ गटनेते, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक नबी शेठ, नगरसेवक संदीप दमकोडवार,बालाजी भैया परदेशी, उपसरपंच निळा गजानन मोरे ,विष्णुकांत देशमुख उपसरपंच ,रामेश्वर पाटील सरपंच मुरंबी, भागवत पांचाळ, दत्ता पांचाळ, लक्ष्मण पांचाळ, गणेश दिगंबरराव ,रमेश दिगंबरराव पांचाळ ,वैजनाथ पांचाळ पोलीस पाटील रायवाडी ,राजाराम पांचाळ अंतेश्वरकर ,गणेश पांचाळ माजी सरपंच रातोळी, ज्ञानेश्वर दिगंबर पांचाळ, बबनराव गडमवाड, वीरेंद्र रमेशराव पांचाळ, शुभम प्रशांत पातेवार, मंगेश पांचाळ ,राहुल इंदुरकर, रमेश पांचाळ पांगरेकर ,देवबा पांचाळ, भुजंग पांचाळ ,रमाकांत पांचाळ, शशिकांत पांचाळ, आकाश तेलंगे, विजय पांचाळ, भाऊ बोईनवाड ,अक्षय भातलवंडे, सचिन संभाजी पाटील तोंडचिरे ,विनायक पांचाळ, मंगेश सावंत पाटील आदी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ४५०जनाची भोजनाची व्यवस्था आयोजक माधव भाऊ पांचाळ यांनी केले व अतिशय उत्साहात हा वाढदिवस साजरा करण्यात आला.