
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम ‘-शंकरराव पाटील महाविद्यालयात प्रकाशन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्रा डी.डी. बोराडे सर तर प्रमुख पाहुणे शंकरराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य तथा उपसचिव प्रा शिंदे एस एस सर होते. प्रा.डॉ. दुनघव ए.डी यांनी महात्मा ज्योतीराव फुले यांचे तत्वज्ञान या पुस्तकाचे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डी. डी. बोराडे सर तसेच संस्थेचे उपसचिव प्रा संतोष शिंदे सर प्रो. डॉ गव्हाणे के. जी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा तिजारे जी यु. यांनी केले तर आभार प्रा साठे सर यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी श्री.रामभाऊ लगाडे व रामलिंग घुले उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.