
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भू म:– तालुक्यातील गणेगाव, आष्टा, शेकापूर,कानडी,ईडा,अंतरगाव, पिंपळगाव, बेलगाव, सामनगाव आदी गावांमधील काढणीला आलेले सोयबीन जागेवरच भिजल्याने प्रचंड नुकसान झाले.
तालुक्यात सतत अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्याने शेतकरी आता सरकारच्या मदतीकडे डोळे लावून आहे. राज्यभर झालेल्या पावसाने उस्मानाबाद जिल्ह्यात देखील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. भूम परांडा वाशी या तालुक्यात काढणीला आलेलं सोयाबीन जागेवरच भिजल्याने प्रचंड हानी झाली आहे. गणेगावचे ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक चेहरा असलेल्या उदयसिंह उर्फ सोनुराजे जाधव यांनी आज शेतात जात नुकसानीची पाहणी केली. शेतकरी बांधव प्रचंड संकटात सापडल्याचे चित्र यावेळी दिसून आले. परतीच्या पावसाने एवढे नुकसान झालेले असताना लोकप्रतिनिधी किंवा शासन प्रशासन यांनी अजूनही म्हणावी अशी दखल घेतलेली नाही. हक्काची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी डोळे लावून आहेत, निदान लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे ही माफक अपेक्षा आहे. कोणताही मोठा लोकप्रतिनिधी फिरकला नसताना सोनुराजे जाधव यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी बांधवांची व्यथा जाणून ती शासन दरबारी मांडू, योग्य पाठपुरावा करू व हक्काचं मिळवून देऊ अस आश्वासन यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिल.