
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
हाळदा :- कंधार तालुक्यातील हाळदा येथे शेतकऱ्यांसाठी शुन्य मशागत तंत्रज्ञान विकसित कशा प्रकारे करायचे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.शुन्य मशागत तंत्रामध्ये बेडवर पिकांची लागवड करून तण नाशकाच्या सहाय्याने तण नियंत्रण करणे व तण जमिनीत गाढून सेंद्रिय खत तयार करणे यामुळे जमिनीची सुपीकता वाढते तसेच पाणी धारण क्षमता वाढते याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी उपस्थित श्री.सचिन पाटील शिंदे (माजी उपसरपंच),श्री.साहेबराव पाटील वसुरे (उपसरपंच),श्री.भरत पांचाळ (तंत्रज्ञान समन्वयक), तसेच गावातील, परीसरातील , शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी होऊन शुन्य मशागत तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.