
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
कंधार–आज दिवाळीनिमित्त दैनिक चालू वार्ताचे मुख्य संपादक डी. एस. लोखंडे पाटील यांनी ग्रामीण पत्रकार संघ उस्मान नगर यांच्या पत्रकार भवनास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या समस्या ह्या कोणत्याही समस्या असो त्या सामाजिक विकासाच्या असल्या पाहिजेत त्या विकासाची भूमिका घेऊन आमचे वर्तमानपत्र त्यांच्यासोबत असेल अथवा वेळप्रसंगी आवाज उठवण्याचं कार्य नक्कीच करेल पण ती घटना सत्य असणे अत्यंत आवश्यक आहे. असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ओंकार लव्हेकर मराठवाडा उपसंपादक दैनिक चालू वार्ता, माधव गोटमवाड कंधार तालुका प्रतिनीधी, बाजीराव पाटील, व्यंकटेश ताटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलताना लोखंडे पाटील म्हणाले, ग्रामीण भागामध्ये माझ्या पाहण्यात एवढे चांगले व दर्जेदार पत्रकार संघाचे कार्यालय प्रथमच पाहण्यातआहे. ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. कारण आजूबाजूच्या परिसरातील व आपल्या गावातील जवळपासच्या घटना पत्रकारांना मांडण्यासाठी एक आपला हक्काचं व्यासपीठ किंवा कार्यालय असणे अत्यंत आवश्यकच आहे आणि ते उस्मान नगर येथील पत्रकारांनी केले ही गोष्ट स्वाभिमानाची वाटते म्हणून मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो असे मत व्यक्त केले.
यावेळी मुख्य संपादक डी.एस लोखंडे पाटील यांनी. इंजिनीयर प्रतीक देशमुख यांचे शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन येथे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रदीप देशमुख लोखंडे सर लक्ष्मण कांबळे व ग्रामीण भागातील बहुतांशी प्रमाणात पत्रकारांची उपस्थिती होती.