
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
चंद्रपूर–
शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली व शहर निवडणूक प्रभारी प्रा. नागेश्वर गंडलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली व चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे व युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्लारपूर शहरात नगरपरिषद व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केल्या गेलेल्या कार्यात भ्रष्टाचार झालेला आहे, त्यामुळे खाली दिलेल्या 13 विषयाची लिखित माहिती 9 नोव्हेंबर पर्यंत देण्यात यावी अन्यता हे.. आंदोलन आणखी तीव्र होत जाईल असे आव्हान शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी केले.
विषय:- १) ३६ लाख रुपये किमतीच्या मोरपंख कुठे गेले?
2) RO वॉटर प्लांटचा लोकांना काय फायदा.?
3) तुटलेल्या सडका कधी दुरुस्त करणार?
4) गंडूर खताच्या टाक्यांचा काय फायदा.?
5) 46 लाखांच्या बायोगॅस प्लांटचा फायदा कोणाला होणार?
6) करोडो खर्चून बनवलेले “बालोद्यान आणि व्यायामाची उपकरणे” जीर्ण अवस्थेत का आहेत.?
7) करोडो खर्चून वसंत वाचनालय कशासाठी बांधला?
8) शहरातील प्रत्येक घरात बारकोड लावून जनतेला काय फायदा.?
9) शहरातील सार्वजनिक शौचालय पाडायचेच होते तर ते का बांधायचे?
10) आरोग्य सुविधांचा अभाव का?
11) टेकडी विभागात तीन लाईनची केबल बंद, का काढली नाही.?
12) वृक्षरोपन केलेली वृक्ष गेली कुठे?
13) नगर परिषदेचा स्विमिंग पूल का बंद आहे?
या आंदोलन ला सफल करण्याकरिता शहर उपाध्यक्ष | अफझल अली आणि गणेश सिलगमवार, सचिव | ज्योतिताई बाबरे, कोषाध्यक्ष | आसिफ शेख, संघटक | डॉ वंगलवार, युथ शहराध्यक्ष | सागर कांबळे, उपाध्यक्ष | गगन सकिनाला, सचिव | रोहित जंगमवार, संघटक | अलींना शेख, CYSS प्रमुख | शिरीन सिद्धीकी, उपाध्यक्ष | आशिष गेडाम, महिला शहराध्यक्ष | अल्काताई वेले, उपाध्यक्ष | सलमा सिद्दीकी, संघटक | किरण खन्ना, सरिता गुजर, बस्ती विभाग प्रभारी | प्रा. प्रशांत वाळके, सुधाकर गेडाम, नलिनीताई जाधव, स्मिताताई लोहकरे, भास्कर नगराळे, दुर्गा शेंडे, विशाखा चौधरी, बेबीताई बुरडकर, सपना चिकाटे, राकेश आमटे यांचे अमूल्य योगदान होते, यावेळी बल्लारपूर शहरातील आम जनता, कार्यकर्ता व पदाधिकारी शेकडो च्या संख्येने उपस्थित होते.