
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासी जनतेसाठी लोकयोगी काम करणाऱ्या युवा सामर्थ्य प्रतिष्ठान या संस्थेचा दुसरा वर्धापनदिन ग्रामीण भाग असणाऱ्या गरदवाडी येथे आदिम कातकरी बांधव व विनवळ(तुंबडपाडा) येथील ६ ते१४ वयोगटातील मुलांना दिवाळीचे फराळ आणि बिस्किटांचे वाटप करून त्यांच्या सोबत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या आदिवासी विद्यार्थ्यांची आणि जनतेची दिवाळी कशी गोड करता या उद्देशाने या दुसऱ्या वर्धापनदिनी ग्रामीण भागाची निवड करून ग्रामीण भागाशी आलेली बांधिलकी जपली.यावेळी संस्थेच्या अध्यक्षांनी युवा सामर्थ्य प्रतिष्ठान करीत असलेल्या कार्याची माहिती देऊन भविष्यात ही संस्था कायम गरीब आणि गरजू जनतेच्या सहकार्यासाठी कटीबद्ध राहील अशी ग्वाही दिली.
या फराळ वाटपा प्रसंगी युवा सामर्थ्य प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष मुकेश वातास,सदस्य भूपेंद्र घाटाळ,काशिराम जंगली,प्रमिला वातास,महेश बिरारी,मनोज वातास,किरण कूवरा,विजय दुधेडा,सुभाष दिघा तसेच असंख्य स्थानिक नागरिक व लहान मुले उपस्थित होती.