
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
आर्णि तालुक्यातील येत असलेल्या कृष्णनगर केळझरा
येथील शहिद ज्ञानेश्वर गोविंदा आडे यांच्या परिवारा तर्फे सावळी सदोबा प्रेस क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्ष तथा पत्रकार बांधवाची शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला,व तसेच प्रेस क्लबचे मावळते अध्यक्ष रुपेश भाऊ खरतडे व नवनिर्वाचित अध्यक्ष दुर्गेश भाऊ कर्णेवार,उपाध्यक्ष रमेश भाऊ राठोड,यांचा पण सत्कार करण्यात आला, यावेळी पत्रकार राम पवार,अविनाश चव्हाण,योगेश शिवणकर, हिरासिंग राठोड,यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी शहीद पिता गोविंदराव आडे,नारायण जाधव,अविनाश भगत, इंदल महाराज चव्हाण, आर्णि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नुनेश्वर भाऊ आडे, सुनिल राठोड,विजय राठोड सहगावातील नागरिक उपस्थित होते, लोकशाहीमध्ये पत्रकारांना चौथा आधारस्तंभ समजल्या जातो,सतत दोन वर्षापासून,कृष्णनगर येथील शहीद परिवाराकडुन पत्रकार बांधवांना आपल्याच परिवारातील भावंड समजून, दिवाळीच्या निमित्ताने आमंत्रित करुन सन्मान करण्यात येतो,मात्र सावळी सदोबा परिसरातील सर्वच राजकीय पांढऱ्या पेशी पुढारी केवळ पत्रकाराच्या माध्यमातून प्रसिद्धीसाठी हापपलेले असतात,या परिसरातील राजकीय नेते फक्त स्वतःच्या प्रसिद्धीचा डांगोरा आज तगायत टीमटीम करताना दिसत आहे,मात्र पत्रकाराची महत्त्वकांक्षी छबी कशी असते हे अजूनही या परिसरातील राजकीय पांढरपेशींना समजलेच नाही, शहीद परिवाराने पत्रकाराचा सन्मान वाढवून त्यांच्या लेखणीला बळ दिलयं,शहीद परिवारांच्या पावनकरांनी केलेले सत्कार समारंभाचे कार्य पत्रकार बांधवांच्या सदैव स्मरणात राहील,कृष्णनगर येथील शहीद परिवारांना पत्रकार बांधवाकडून मानाचा सलाम.