
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:नांदेड जिल्हयात सर्वात मोठा तालुका असलेले देगलूर शहर हे आहे. महाराष्ट्र तेलगांना, कर्नाटक च्या सिमेवर असल्यामुळे तिनही राज्यातून मोठया संख्येने रुग्ण उपचारसाठी रुग्ण येतात, रक्त तपासणीची सोय देगलूरला व्हावी जेनेकरुन गोरगरीब आर्थीक दृष्टया रुग्णांना देगलूरला लॅबची सोय झाल्यास सोयीस्कर होईल व लवकर रिपोर्ट मिळतील व त्यांना दिलासा मिळेल. मूत्रपिंड (किडणी) आजाराच्या रुग्णांना नांदेडला जावे लागते गरीब सामान्य दुर्बल लोकांना हे खुप त्रासदायक आहे. म्हणून मुत्रपिंडाच्या रुग्णांना तपासून निदान, उपचारासाठी आवश्यक यंत्रणा जसे तज्ञ डॉक्टर, तपासणी व निदानासाठी लॅब डायलेसिससाठी आवश्यक ती यंत्र, उपचार व औषधीची सोय देगलूरला व्हावी व लोकांना सुविधा मिळावे या करीता संभाजी ब्रिगेड देगलूरच्या वतीने निवेदन देण्यात येते. या निवेदनाची दखल घेऊन देगलूर तालुक्यातील रुग्णांची सोय व्हावी अन्यथा संभाजी ब्रिगेड देगलूरच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असे अॅड अंकुश राजे जाधव
विधानसभा अध्यक्ष . देगलूर बिलोली व
जेजेराव पाटील शिंदे करडखेडवाडीकर संभाजी ब्रिगेड तालूका अध्यक्ष देगलूर यांनी केली त्यावेळी खाली पदाधिकारी उपस्थित होते
देविदास पा थडके
सुनिल जाधव -बजारंग पा. कुशावाडकर
बालाजी पा. कुशावाडीकर देशमुख ईश्वर नागनाथराव