
दैनिक चालू वार्ता उपसंपादक मराठवाडा-ओंकार लव्हेकर
कंधार—शिवा’ कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे वीरशैव लिंगायत समाजातील जाती व पोटजातीच्या गुणवंत, प्रतिभावंत, व यशवंतांना प्रबलन व प्रोत्साहन मिळावे या उदात्त भावनेने व सामाजीक बांधीलकीच्या जाणीवेतून गुणवंतांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन आयोजित केले आहे. कार्यक्रमाध्यक्ष प्रा. मनोहरराव धोंडे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, शिवा संघटना,प्रमुख मार्गदर्शक अभिजीत राऊत आय ए. एस जिल्हाधिकारी, नांदेड,उद्घाटक वर्षाताई ठाकुर-घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड,प्रमुख उपस्थिती संजय बेळगे मा. शिक्षण सभापती, जि.प. नांदेड, बालाजी पांडागळे मा.सभापती पं.स.कंधार,प्रमुख पाहुणे डॉ. गोविंद नांदेडे पुर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य, डॉ.दत्तात्रय मठपती शिक्षण सहसंचालक लातूर विभाग, उमाकांत शेटे राष्ट्रीय सरचिटणीस शिवा संघटना, वैजनाथ तोनसुरे राज्य उपाध्यक्ष शिवा संघटना, विठ्ठल ताकबीडे राज्य सरचिटणीस शिवा कर्म .महासंघ,धन्यकुमार शिवणकर राज्य सरचिटणीस, शिवा संघटना,संजय कोठाळे मराठवाडा अध्यक्ष, शिवा कर्म महासंघ, इंजि. अनिल माळगे जिल्हा संपर्क प्रमुख, शिवा संघटना, नांदेड कार्यक्रम शनिवार, दि. १२ नोव्हेंबर २०२२ दुपारी १२:१५वा.स्थळ कै. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आहे तरी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिगंबर मांजरमकर
जिल्हाध्यक्ष (उ.) ,वीरभद्र बसापुरे जिल्हाध्यक्ष, (द.) शिवा कर्मचारी महासंघ सर्व पदाधिकारी संयोजन समिती यांनी केले . अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे यांनी दिली आहे.