दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता. अहमदपूर येथे काल दि. १४/११/२०२२ रोजी सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संचालक कुलदीप हाके पाटील व प्रमुख उपस्थिती संचालिका सौ. शिवालिका कुलदीप हाके पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमामध्ये बालदिनानिमित्त विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी भाषण केले. अध्यक्षांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देवून त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेण्यात आले व त्यांना उत्साहित करण्यात आले. या जयंतीच्या व बालदिनाच्या कार्यक्रमाचे प्रात्साविक व संचालन प्रा. संभाजी सांगळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. प्राचार्या सौ. रुथ चक्रनारायण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक प्रा. भारत कानवटे, प्रा. शुभम पोले, प्रा. ऋतिक पोले, प्रा. शेख मोसिन, प्रा. शुभांगी सूर्यवंशी, प्रा. हीना कुल्लुरकर, प्रा. ज्योत्सना स्वामी, प्रा. स्नेहा ओझा, प्रा. अंजली बोधनकर व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.
