
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : रेल्वेच्या मध्य विभागातील कल्याण, दादर, सीएसएमटी परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे युध्दपातळीवर चालू असल्याने परभणी कडे येणाऱ्या व परभणी हून मुंबईकडे जाणाऱ्या सुमारे १३ गाड्या रद्द केल्या जाणार असल्याची माहिती नांदेडच्या रेल्वे विभागातर्फे देण्यात आली
आहे. सदरील नमूद सर्व रेल्वे गाड्या १९, २०, २१ नोव्हेंबर रोजी धावणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये तपोवन एक्स्प्रेस १९, २०, २१ दरम्यान धावणारी नाही. नंदीग्राम एक्स्प्रेस २० व २१ रोजी, राज्यराणी एक्स्प्रेस १९ व २० रोजी तर देवगीरी एक्स्प्रेस १९ व २० नोव्हेंबर रोजी धावणार नसल्याने परभणीहून मुंबईला जाणाऱ्या तर मुंबईहून परभणीला येणाऱ्या आमच्या वाचक वृंदांबरोबरच समस्त प्रवासी नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. असं असलं तरी रेल्वेसंबंधीच्या विकासाला व गतीमान प्रवासाला चालना देण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते करण्यासाठी प्रवासी नागरिकांच्या सहकार्याची गरज नितांत महत्वपूर्ण ठरली जाणे.