
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
आठ लाख दहा हजाराचा रुपयांचा धनादेश सुपुर्द.
देगलूर- प्रतिनिधि भारतीय टपाल विभागातील पोस्टल लाईफ इ्शुरन्स टपाल जिवण विमा पाँलिसि रामकिशन काशिनाथ राठोड रा. हाळणी तालुका मुखेड बारहाळी येथे वनरक्षक म्हणुन कार्यरत होते त्यांनी सहा लाख रुपयांचा जिवण विमा घेतला होता .त्यानी नियमित पणे हप्त्याचा भरणा करीत होते व त्यांनी पोस्टल विमा घेऊन फक्त दोन वर्ष झाले होते .
गेल्या दोन महीण्यापुर्वि राठोड यांचे अपघाती दुर्दैवाने निधन झाले. दरम्यान पोस्टल लाईफ इ्शुरन्स जिवण विमा धारक रामकिशन राठोड यांच्या वारस पत्नी सुनिता रामकिशन राठोड यांनी पतीचे निधन झाले असुन त्याच्या विमा पाँलिसि ची रक्कम मिळावी म्हणून अर्ज केला होता .
नांदेड डाक विभागाचे डाक अधिक्षक राजीव पालेकर यांनी देगलूर उप डाक विभागाचे डाक निरिक्षक बी ए मुंडे यांना आदेश देऊन त्वरित विमा धारकांच्या वारसास रक्कम देण्यासाठी सांगितले. डाक निरिक्षक मुंडे यांनी विलंब न करता विमा क्लँम साठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करन अवघ्या दोन महीण्यात मयत राठोड यांच्या पत्नी सुनिता रामकिशन राठोड यांना 8,10000 आठ लाख दहा हजार रुपयांचा धनादेश डाक निरिक्षक बी ए मुंडे यांच्या मार्गद्शनाखाली पोस्टमास्तर एस एन सुरकूटलावार , बी. एम. जाजनूरे , वी. एम. दासरवाड , एल स सोळूके यांनी 24 नोव्हेंबर रोजी धनादेश सुपुर्द केला.
पोस्टल लाईफ इ्शुरन्स विमा धारकांच्या कुंटुंबास संकटकाळी विमा रक्कमेचा आधार मिळाल्याने त्यानीही डाक विभागाला धन्यवाद दिले असून समाधान व्यक्त केले आहे…