
दैनिक चालु वार्ता ता मुखेड प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
मुखेड नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी बाबुराव देबडवार हे शुक्रवारी दिनांक दोन डिसेंबर रोजी आपल्या बस स्थानकासमोरील दुकानात बसले होते सेवानिवृत्त सैनिक गजानन विश्वनाथ मदनवाड हे त्यांच्या दुकानात गेले व बाबू सावकार यांना उद्देशून तू माझ्या घराचे बांधकाम का आवडतोस तू माझ्या विरोधात पोलीस तक्रार का दिलीस असा जाब विचारत काही कळण्याच्या आत त्यांच्या दुकानातील लोखंडी फावडे व त्याच्या लाकडी दांड्याने दाबू सावकार यांना जबर मारहाण केली. यात बाबू सावकार देबडवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान या हल्ल्यात मध्यस्थीयासाठी आलेल्या दुकानातील दोन कर्मचाऱ्यांनाही मार लागला असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात मुखेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले बाबू सावकार यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे .दरम्यान पोलिसांनी आरोपी गजाननवनात मदनवारयांना ताब्यात घेतली असूनत्यांच्या विरोधात पुढील कार्यवाही चालु आहे असे सांगीतले.