
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कळका :- येथील खंडोबा ची यात्रा उत्सव व दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.पालखी मिरवणूक काढण्यात आली असून पालखीसाठी मोठ्या संख्येने वाघे व भाविक भक्तांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला होता.रात्री सांस्कृतीक कार्यक्रम हिराबाई डोंगरे नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता.त्यानंतर खंडेरायाचा जागर वाघ्या मुरळी यांनी सादर केला मल्हारीच्या जागरणासाठी परीसरातील भाविक भक्तांनी श्रवणाचा लाभ घेतला.कुस्तीसाठी पहेलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यामध्ये पहिले बक्षीस ७००१, दुसरे बक्षीस ५००१, तिसरे बक्षीस ३००१ रूपये देऊन पहीलवानांचा सत्कार करण्यात आला.तसेच अखंड विश्वाचे मालक गुरू देव दत्त यांची जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता.भाविक भक्तांनी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.यात्रा कमीटी, गावकरी मंडळी कळका कळकावाडी, यांनी यात्रा उत्सव आनंदाने साजरी करण्यात आली असल्याची माहिती कळका येथील उपसरपंच प्रतिनिधी श्री.राजीव पाटील गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते श्री.गिरमाजी पाटील यांनी दिली आहे.