
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
पेठवडज :- कंधार तालुक्यातील पेठवडज येथे देविदास पाटील कारभारी यांच्या संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविद्यालयात पेठवडज येथे शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने सौ. आशाताई शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित याप्रसंगी देविदास पाटील कारभारी,दत्ता गायकवाड, चेअरमन प्रदीप पाटील नंदनवणकर,गिरीश डीगोळे,ओम ठाकूर,राहटी सरपंच नीळकंठ कौसल्ये, जाकापुर सरपंच गोपाळ पाटील,शिर्शी सरपंच मनोहर पाटील, गोनार सरपंच हरी पाटील पवळे,मगनाळी सरपंच अभंगे,साई पुठवाड,माजी सरपंच रामदास गुद्देवार सह कार्यकर्ते,गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..