
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- काँग्रेस पक्षाचे तालुका सचिव बाळासाहेब रामराव पवार यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या आई माजी नगरसेविका कालवश लक्ष्मीबाई रामराव पवार यांच्या स्मरणार्थ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मोठी प्रतिमा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बालाजी पांडागळे यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयास भेट देण्यात आली.
यावेळी कंधार काँग्रेस पक्षांचे जेष्ठ नेते व न.पा.माजी नगराध्यक्ष रामराव पवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष बालाजी पांडागळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर, डॉ. गुडमेवार, डॉ. पोकले, डॉ. पदमवार, कदम सर, शहराध्यक्ष हमीद सुलेमान, अड.पुलकुंडवार, बाळासाहेब गोमारे, प्रताप शिंदे, राम सोंनसळे,कमलाकर शिंदे, अनील कदम,सतिश देवकते, स्वप्निल परोडवार, अजिंक्य पांडागळे, नितीन राजूरकर,किरण कांबळे,अजय भंडारे, लखन जोंधळे, कपिल जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ही प्रतीमा देताना कुटुंबातील रामराव पवार, बाळासाहेब रामराव पवार, डॉ.तक्षशिला पवार ,नमन पवार ,कृतीका पवार, सौ.सविता वाघमारे, सौ.संगीता बामणे, सौ. प्रेमाला भांडारे, सौ.सोनाली कांबळे यांची उपस्थिती होती.