
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
नांदेड.
जि.प.प्रा.शा.नविन कौठा नांदेड या शाळेत तेविस विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवुन त्यांचे नावे शैक्षणिक वर्ष 2020-21, 2021-22 करिता मिळालेल्या शालेय अनुदान , शालेय गणवेश अनुदान ,विना आधार कार्ड प्रवेशित विद्यार्थी ,बोगस अपंग शिक्षक प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकाची व मुख्याध्यापक यांच्या अनियमित ते बाबत संबंधित शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून बडतर्फ करावे व त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी नागराज बनसोडे ,गंजेवार, केंद्रप्रमुख कुरडे ,सविता बिर्गे शिक्षणाधिकारी नांदेड यांचे वर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विद्यार्थी आघाडी जिल्हा नांदेड तर्फे जिल्हाध्यक्ष अॅड. संघरत्न गायकवाड यांनी जिल्हा परिषद कार्यालय नांदेड समोर 29 नोव्हेंबर 2022 पासून आमरण उपोषणास सुरुवात केली होती जिल्हा परिषद प्रशासन स्थानिक राजकीय दबावामुळे आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष करत होते त्यावेळी उपोषणाच्या आठव्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून विवीध सामाजिक संघटना प्रमुख ,राजकीय नेते ,नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष व सदस्य आणि वकील बंधू यांनी अॅड.संघरत्न गायकवाड यांना जाहीर पाठींबा दिला आमरण उपोषणाचा आठवा दिवस असून सुद्धा प्रशासन राजकीय दबावामुळे दखल घेत नसल्याची बाब लक्षात येताच संबंधित वरिष्ठ अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ठोंबरे यांना बौध्द धर्मगुरू माननीय भदंत पैंय्या बोधी ,वंचित बहुजन आघाडीचे नेते इंजिनियर प्रशांत भाऊ इंगोले व सुनिलभाउ सोनसळे ,बी आर एस पी चे राज्यसचिव नाथा कांबळे सर ,माननीय पंचशील भाऊ कांबळे विरोधी पक्षनेता नगरपरिषद लोहा , अॅड भिमरत्न कांबळे विधी सल्लागार म.फु.स.प.वि.आ.,बिएसपी युवा जिल्हाध्यक्ष विकी भाऊ वाघमारे, पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा कार्याध्यक्ष अशोकदादा कसबे , बि.आर.एस.पी चे युवा जिल्हाध्यक्ष राहुलदादा कसबे , संदिपभाउ घोडजकर, , अॅड,बाळारसाहेब कांबळे,अॅड.यशोनील मोगले, अरुण कांबळे , नितीन कांबळे,धम्मा कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी उपोषणार्थीचे आमरण उपोषण आठवा दिवस असताना एवढा विलंब का? असा जाब विचारुन धारेवर धरले असता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अॅड.संघरत्न गायकवाड यांच्या काही अंशी मागण्या मान्य करून संबंधित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन कवठा नांदेड या शाळेतील मुख्याध्यापक आनंदा मुसांडे, सहशिक्षक बालाजी आडे पवार, बालाजी बड्डु, जयश्री राठोड ,करुणा सोनकांबळे, ज्ञानेश्वर हराळे ,आणी भाग्यश्री जाधव यांना तात्काळ निलंबित करून त्यांचेवर विभागीय चौकशी लावून विभागीय चौकशी यांच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येईल त्यात गट संवर्ग एक नुसार बदली करून आलेले सहशिक्षक यांना पडताळणीसाठी सक्षम प्राधिक रण वैद्यकीय प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी जे जे हॉस्पिटल मुंबई येथे पाठवण्याची कारवाईचे पत्र दिले असता अॅड.संघरत्न गायकवाड यांनी त्यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले.