
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
अटकळी येथील किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री अटकळे सर म्हणाले की आपल्या परिस्थितीची कारण न देता मनात जिद्द ठेवून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा परिस्थिती माणसाला घडवत नाही आणि बिघडवतही नाही माणूसच परिस्थिती घडवतो व माणूसच परिस्थिती बिघडवतो हीच सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे जोपर्यंत तुम्हा विद्यार्थ्यांच्या मनात येणार नाही तोपर्यंत तुम्ही यशाचे उंच शिखर गाठणार नाही आई वडील फक्त तुम्हाला शैक्षणिक साहित्य पुरवठा करू शकतात पण अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे यासाठी तुम्ही स्वतः मोठे ध्येय ठरवा आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करा असे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते व तसेच यावेळी श्री पेंटे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूलमंत्र अंगीकृत करा असे आव्हान केले यावेळी शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी भाषणे केली यात कु. अंकिता चिंतावार, कु. मुस्कान शेख, प्राची येवते, शेख साबेर, नंदनी जाधव, अनुजा हेंटे, पूजा पाटील, शेख सना, प्रथमेश येवते, गायत्री पाटील, प्रतिभा कुर्नापल्ले , शेख सानिया, मयुरी मेहेत्रे, शेख दस्तगीर, समीक्षा मंगरूळे, पुनम जाधव, विद्या कुर्नापल्ले, तेजस्विनी शिवशट्टे, प्रणाली पिंपळ नारीकर, वैष्णवी गायकवाड आधी विद्यार्थ्यांनी भाषणे केली यावेळी पत्रकार काशिनाथराव वाघमारे प्राध्यापक मोरे सर ,कचवे सर, विभुते सर, शेटकर सर, गव्हाणे सर, बैस सर, कनशेट्टे सर आदी मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते