
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी- श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी ते अकोट महामार्गावरील खाऱ्या नाल्याजवळ दिनांक ४ सप्टेंबर रोजी एका व्यावसायिकाच्या गोडाउनवर अज्ञात ५ ते ६ लोकांनी दरोडा टाकून अलमारीतील ४ लाख रुपये रोख रक्कम लंपास केली होती.सदर प्रकरणातील २ आरोपींना अंजनगाव पोलीसांना पकडण्यात यश आले असून आरोपींकडून अकोला येथून ४,मध्यप्रदेश मधून २ असे ६ जण आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली.यातील अतिक नीयाज अब्दुल मुनाफ (वय २९) राहणार बुधवारा सुर्जी याने आलेल्या ६ लोकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.तसेच उबेद खा शफि खा (वय ३४) राहणार भालदारपुरा अंजनगाव सुर्जी याने आलेल्या लोकांना घटनास्थळ व व्यावसायिकांची माहिती पुरवली सहा लोकांपैकी सूत्रधार अकोला येथील असून अतीक नियाज अब्दुल मुनाफ हा गोडाऊन बाहेर उभा होता.मुख्य सूत्रधाराने सर्व काम एकमेकांना सोपवून दिले होते आणि मुख्य सूत्रधाराने व त्यासोबतच्या इतर लोकांनी दरोड्याला सफलता दिली.याबाबत पोलीसांनी तपासाची चक्र फिरवत अतीक नियाज अब्दुल मुनाफ व उबेद खा शफी खा यांना ताब्यात घेऊन अंजनगाव सुर्जी पोलीसांनी कसून चौकशी केली असता त्याने अकोला येथील ४ लोक व मध्य प्रदेश मधील २ लोक दरोड्यांमध्ये सामील असल्याची माहिती दिली.
त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने अकोला येथे तपासाकरिता गेले असता घटनेतील आरोपी फरार झाले.सदर कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव,उपविभागीय अधिकारी सच्छिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे,अंजनगाव सुर्जी ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात अंजनगाव सुर्जी गुन्हे शाखेच्या टीमने यशस्वी कारवाई केली पुढील तपास अंजनगाव सुर्जी ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.