
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्हा परिषद कार्यालय अमरावती येथे आज गुरुवार दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आले.यावेळी कार्यकारी अधिकारी श्री.तुकाराम टेकाळे व उपकार्यकारी अधिकारी श्री.गिरीश धायगुडे यांच्या हस्ते संतांची महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.
संताजी महाराजांची जयंती निमित्त संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी संताजी महाराजांच्या जीवन कथेवर प्रकाश टाकला आणि म्हणाले की या थोर संताचा जन्म ८ डिसेंबर १६२४ महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंब्रे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरात झाला विठोबा जगनाडे आणि आई मथाबाई हे विठ्ठल भक्त होते.त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले.संताजींचे शिक्षण हे फक्त हिशोब करण्यापुरते झाले.त्यानंतर त्यांनी पारंपरिक व्यवसायात म्हणजेच तेल गाळण्याच्या कामात वडिलांना हातभार लावला.त्यानंतर वडिलांनी वयाच्या बाराव्या वर्षीच यमुनाबाई नावाच्या मुलीसोबत लग्न लावले व ते संसाराच्या बेडीत अडकले.त्यानंतर संत तुकारामांचे कीर्तने ऐकून ऐकून संताजींवर संत तुकारामांचा मोठा प्रभाव पडला.तेव्हा संत तुकारामांनी संताजींना समजावून सांगितले की संसारात राहून सुद्धा परमार्थ सांगता येतो आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज (संतु तेली) हे संत तुकारामांच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले.नदीमध्ये बुडवून नष्ट केलेल्या तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले.शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी संताजीना दिले होते.परंतु तुकाराम हे संताजी जगनाडे यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले.असे म्हणतात की,जेव्हा संताजी वारले तेव्हा अंत्य संस्काराच्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते, त्याचा चेहरा वरच राहत होता.तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला. यातून आपल्या सर्वांना खूप काही शिकण्या जोगे आहे असे पंकज गुल्हाने यांनी म्हटले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाने,श्री.किशोर वानखडे,श्री.विजय कावळे,श्री विजय हुपरीकर ,श्री.परमेश्वर राठोड,श्री.नितीन माहुरे,श्री.भिमराव तायडे,श्री.विजय शेलुकर,श्री.रोशन गोरडे,श्री.गजानन इंगळे,श्री.राहुल रायबोले,श्री.सतीश पवार श्री.सुजित गावंडे,श्री.सक्षम तंदुरे चांदुरे,श्री,आदित्य तायडे,श्री.निशांत तायडे,श्री.ओमेंद्र देशमुख,श्री.विशाल विघे,श्री.शेख इमरान,श्री.सुदाम वानखडे,श्री,अशोक कांडलकर,श्री.विनोद फसाटे,सौ.रजनी म्हस्के,सौ.मनीषा घुबडे,सौ.गायत्री लाचुरे,श्रीमती सुशीला तानोडकर,श्रीमती सारिका राऊत आणि सर्व जिल्हा परिषद कार्यालयाचे कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.