
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
शेतकऱ्यांना शासनाच्या योजनाची माहिती तसेच कृषी विषयक सल्ला मार्गदर्शनक म्हणून कृषी सहाय्यकांची शासनाने नेमणूक केलेली असते. त्या कृषी साहयकाचे काम आहे की शेतकऱ्यांना गावात जाऊन शासनकडून आलेल्या योजनाची माहिती देणे. गावात जनजागृती करणे परंतु मंठा तालुक्यातील काही गावावात कृषी साह्यक फिरकत नाही. शिकलेले मोबाईल इंटरनेटचे ज्ञान असलेले शेतकरी तालुक्याला फिरणारे. शासनाच्या योजनेचा फायदा घेत आहे गरीब, नशीकलेले , मोबाईल नसलेलं शेतकरी योजने पासून वंचित आहे.
शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला देण्यासह शासनाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी व शासकीय योजना राबविल्या जाव्यात यासाठी कृषी विभागाकडून कृषी साहयकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र तालुक्यातील बहुतांश खेड्यात कृषी सहाय्यक गावात जातच नसल्याने शेतकऱ्यांना कुठलेही मार्गदर्शन मिळत नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती विषयक सल्ला मिळावा, शासनाच्या योजनांची माहिती मिळावी तसेच शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना योग्यप्रकारे राबविल्या
जातात का, या पाहणीसह इतर उद्देशाने कृषी विभागाकडून कृषी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या कृषीविषयक योजनांची शेतकऱ्यांना माहिती देण्याचे प्रमुख काम या कर्मचाऱ्यांकडून होते. शिवाय, कृषी शिबिरांचे आयोजन, माती परीक्षण करणे गरजेनुसार शेतीपिकांची पाहणी व अहवाल, अशाच अनेक कामांची जबाबदारी या कृषी साह्यकाची असते. मात्र, बरेच कर्मचारी कृषी सहाय्यक गावात येतच नसल्याची तक्रार शेतकऱ्यांमधून केली जात असून, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यातर्फे होत आहे.