
दैनिक चालू वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :- गेल्या आठ दिवसापासून अंजनगाव सुर्जी तसेच दर्यापूर शहराला शहानुर प्रकल्पातून गडुळ पाण्याचा पुरवठा होत आहे.त्यामुळे जनसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दूषित पिण्याचा पराठा पुरवठा होत असल्याने बालकांचे आरोग्य सुद्धा मोठ्या प्रमाणात धोक्यात आले.परंतु पाणीपट्टी कर हा नियमित येत असून त्या तुलनेत सुविधा ही अपुरी पडत आहे.तर दुर्गंधीयुक्त पाणी व जंतूजन्य पाणी पुरवठा होत असून याकडे जीवन प्राधिकरण विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे असे नागरिकांनी व्यक्त केले.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असून जीवन प्राधिकरण विभागाने याची तात्काळ दखल घेत शहरांना स्वच्छ पाणी पुरवठा करणे क्रमप्राप्त आहे.