
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा.तालुक्यांतील 35 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे.त्यातील 4 गावाची निवड अविरोध झाली आहे राहिलेल्या 31थेट जनतेमधून सरपंचाची निवड होणार आहे. याशिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीच्या गणनेनुसार सदस्य पदासाठी देखील निवडणूक होत आहे. यामध्ये सरपंच पदासह सदस्यपदाच्या तुलनेत खर्चाची मर्यादा दिली आहे.
यापेक्षा जास्त खर्च करणाऱ्या उमेदवारावर जिंकूनही अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज केल्यापासून उमेदवारी खर्चाची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे पावत्यांसह नियमितपणे खर्च
सादर करावा लागतो. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत उमेदवाराचा निवडणूक खर्च असतो. विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास त्याच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण दाखल करण्यात येते व यामध्ये दोषी निष्पन्न झाल्यास त्याच्यावर
अपात्रतेची कारवाई केली जाते. यावेळी थेट जनतेमधून निवड होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त बळावली आहे.खर्चिक मतदारामुळे व स्पर्धेमुळे उमेदवारांचा निवडणूक खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. मात्र, मोठेपणा उमेदवारांच्या अंगलट येण्याची दाट शक्यता आहे. (चौकट )*खर्चाची मर्यादा कोणाला किती**—–
7ते 9 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी निवडणूक खर्च मर्यादा 50हजार रुपये व सदस्यासाठी 25हजार रुपये, 11व 13 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी 1लाख रुपये व सदस्यासाठी 35 हजार रुपये तर 15व 17 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी निवडणूक खर्च मर्यादा 1 लाख 75 हजार रूपये तर सदस्यासाठी 50 हजार रुपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.