
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील करडखेड या ठिकाणी पांदण रस्त्याचे उद्घाटन विद्यमान देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मा.गट विकास अधिकारी शेखरजी देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी मा.डॉ. आकाश जी देशमूख, माजी करडखेड चे सरपंच पंकजजी देशमुख , देगलूर पंचायत समिती चे माजी सभापती श्री बळेगावकर देशमूख, ग्रामविकास अधिकारी श्री तोटावार , कार्यक्रम अधिकारी ढाले , प. स. अभियंता (JE ) श्री नरहरी ,तांत्रीक अधिकारी ( J E ) श्री काळे ,सरपंच प्रतिनिधी श्री गणपतजी शिळवणे , ग्राम रोजगार सेवक साहेबराव शिंदे.ग्रामपंचायत सदस्य, मोठया प्रमाणात गावकरी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.