
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरातील जुना लोहा येथील अत्यंत गरीब कुटुंबातील लक्ष्मीकांत कहाळेकर हा विद्यार्थी जिद्द, मेहनत,व कठोर परिश्रमाच्या जोरावर रात्र-न- दिवस अभ्यास करून वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या एमबीबीएससाठी पात्र ठरून जळगाव येथील शासकीय एमबीबीएस काॅलेजला प्रवेश मिळाला परंतु घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असुन वडीलाचे क्षेत्र हरवले आहे आई शिवणकाम करून घर चालविते लक्ष्मीकांत कहाळेकर हा एमबीबीएससाठी पात्र ठरल्यामुळे त्याला पुढील शिक्षणासाठी आर्थिक चणचण भासत असल्यामुळे त्याला लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगरअध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांनी पन्नास हजार रुपयांची मदत लोहा नगरपरिषदेत बोलुन शाल श्रीफळ देऊन त्याचा व त्यांच्या आईचा सत्कार केला व पुढिल शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी नगरसेवक जिवन पाटील चव्हाण नगरसेवक नबी शेख कंधार नगरपरिषदेचे माझी उप आधक्ष मन्नानभाई शेठ बुलढाणा बॅकेचे शखाआधिकारी केशवराव शेटे राजुभाऊ शेटे सामाजिक कार्यकर्ते दताभाऊ शेटे माधव वसमतकर काशीनाथ शेटे माधव फाजगे पत्रकार केशव पाटील पवार केलास काहाळेकर आदी उपस्थित होते
लोकहित सर्वतोपरी हे ब्रीद वाक्य घेऊन सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य,आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी व गोरगरिबांच्या मदतीस तत्पर आसनारे लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगरअध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी हे लोहा शहरातील गरीब कुटुंबातील अत्यंत हुशार व होतकरू विद्यार्थी
लक्ष्मीकांत कहाळेकर यांचा एमबीबीएसच्या शिक्षणासाठी पात्र ठरला पंरतु त्यांना शिक्षणासाठी आर्थिक चणचण भासत होती पैशाअभावी त्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून अनेक दानशूर व्यक्ती हे आर्थिक मदत करीत आहेत त्यांचाच एक भाग म्हणून लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगरअध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांनी लक्षीमीकांत काहाळेकर यांचा सत्कार करुन पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात आली
तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी व अनेक श्रीमंत असलेले व्यापारी, सरकारी नौकरदार , लोकप्रतीनिधी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासुन एमबीबीएससाठी पात्र ठरलेल्या व भावी डॉक्टर असलेल्या लक्ष्मीकांत कहाळेकर यांना जमेल तशी आर्थिक मदत करावी असे आवाहन लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगरअध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांनी केले.