
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा : शेतकऱ्यावर नको ते संकट येत असल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. अगोदर अतिवृष्टी सतत दोन ते अडीच महिणे संततधार पावसाचे संकट, परतीच्या पावसाचे संकट, पिकावर आलेल्या रोगराईचे संकट व आता वन्यप्राण्यांसोबतच शेती साहित्य चोरट्याचा वाढलेला त्रास तर कधी वन्यप्राणी हरीण, रोही, राणडुकर, वानर पिकात घुसून पिकाची नासधूस करीत रात्री बेरात्री राखण कराव लागत आहे वन्यप्राणी बळीराजाच्या जीवावर उठले आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून शेतकऱ्यावर संकटांची मालिका सुरूच आहे.
शेतकऱ्यांना बळीराजा, अन्नदाता अशी उपाधी दिली जाते. परंतु, त्यांच्या
समस्येवर लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करतात. यावर्षी शेतकऱ्यांना अतिवृष्टीसह विविध संकटांचा सामना करावा लागला. त्यानंतर शेतकऱ्याच्या हातात सोयाबीन इतर शेतमाल आला पण त्या शेतमालाला अल्पभाव मिळत असल्याने उत्पादन खर्च निघत नाही.. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन दुसऱ्यांना ठेक्याने किंवा बटाईने देणे सुरू केले आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन कोरडवाहू असल्याने शेतात विहीर खोदून पिकाच्या सिंचनासाठी विद्युत मोटारपंप बसविली. परंतू विद्युत मोटारपंप, ठिबक नळ्या, तुषार नोजल, पाईप,स्टार्टर शेती औजारे चोरीस जात आहे.