
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
वैजापूर तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आणि आमदार सतीश चव्हाण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षअंतगर्त वाद सुरु होता.त्यामुळे अखेर भाऊसाहेब चिकटगावकर यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र केले आहे.तर भाऊसाहेब चिकटगावकर यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत भाऊसाहेब चिकटगावकर यांनी प्रवेश केला आहे.स्वतः उद्धव ठाकरेंच्या हस्ते चिकटगावकर यांच्या हातात ‘शिवबंधन’ बांधून त्यांना प्रवेश देण्यात आला.यावेळी त्यांच्यासोबत पैठणचे भाजपचे नेते बद्रीनाथ भुमरे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली