
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग कृमांक १६१ अ हे दळण वळणासाठी सुखकर होईल असे वाटत होते परंतू या रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे हा रस्ता दारुड्यांसाठी एक रेस्टॉरंट बनल्याचे दिसत आहे, या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत दारूचा आस्वाद घेत मज्जाव करीत आहेत परंतू या कारणामुळे या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहेत.
गावात दारूबंदी असल्यामुळे या भागतील लोक सर्रासपणे दारू घेऊन रात्रीच्या वेळेस या रस्त्यावर समाधान पित बसत आहेत, परंतू या सर्व गोष्टींचा नाहक त्रास दुचाकी व चार चाकी वाहनांना होत आहे. रात्रीच्या वेळेस हणेगाव ते वझर, हणेगाव ते तुंबरपल्ली हा रस्ता दारुड्यांसाठी रेस्टॉरंट बनल्यासारखे दिसते
परंतू राज्य उत्पादन शुल्क यांच्यावर कसल्याच प्रकारची कार्यवाही करीत नाही किंवा कधी या भागात फिरकत सुद्धा नाहीत. राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र नावालाच असून यांचे कार्य काय आहे व यांचे कार्यालय देगलूर येथे आहे असेच म्हणतात परंतू यांची आजपर्यंत यांच्या कार्यालयात भेट झाली नाही अथवा हे अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. ऑफिसमध्ये चर्चा करायला गेले तर उद्धट भाषा बोलून आमचं काम आम्हाला शिकवू नका अशा भाषेमध्ये उत्तर देतात तेथील कर्मचारी
या राष्ट्रीय महामार्गावर जास्त प्रमाणात वाहनांची वर्दळ नसल्यामुळे प्रशस्त वातावरणाचा फायदा घेत रात्री उशिरापर्यंत दारूचा आस्वाद घेतला जात आहे त्या परिसरातील महिला व वृद्ध नागरिक त्या रस्त्यावरून जाण्यासाठी जीव मोठी धरून प्रवास करत आहेत अनावधानाने अपघात होत आहेत परंतू याच्यावर कसल्याच प्रकारे प्रशासन निर्बंध घालत नाही
या परिसरातील दारू विक्रेते व
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्या संगणमत झाल्याचे त्या परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे . आता तरी प्रशासनाने या विषयाकडे लक्ष घालून लवकरात लवकर त्या परिसरातील अशा दारुड्यावर कठोर कारवाई करून त्या परिसरातील जनतेला न्याय देण्याचे काम करेल काय?