
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..आजकाल लहान मोठयासह सर्वसाधारण माणूसही अँड्रॉईड मोबाईलशिवाय दिसत नाही. मोबाईल जीवनावश्यक वस्तू बनला असल्याचे चित्र आहे. तरुणाई तर स्मार्टफोनमध्ये गुरफटलेली दिसते. मोबाईल जणू तरुणांच्या गळ्यातील ताईतच बनला की काय ? असे चित्र सर्वत्र दिसून येते.यामुळे मैदानी खेळ कमी प्रमाणात खेळले जात आहे.
मोबाईल जवळ नसला की, माणूस अस्वस्थ, बेचैन होतो. मोबाईलचा नाद इतका वाढला की, बहुतांश जण शौचालयात जातांनासुद्धा सोबत नेतात. अचानकपणी मध्येच मोबाईलची बॅटरी उतरली की मूड ऑफ होतो. अती वापर धोकेदायक आहे, . वैद्यकीय भाषेत ही सवय माहित असूनही मोबाईल ‘नोमोफोबिया’ ची लक्षण असल्याचे.माहिती असूनही तरुणांच्या हाताला चिपकलेलाच असतो.
मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचा मेंदूवर परिणाम होतो. स्मरणशक्ती कमी होणे, लक्ष केंद्रित न होणे, डोकेदुखी, बहिरेपणा यासारखे आजार उद्भवत आहेत. गरोदर स्थितीत मोबाईलचा अतिवापर महिलांना घातक आहे, असे जाणकार सांगतात.
मोबाईलच्या अती वापरामुळे ‘नोमोफोबिया’ सारख्या आजार होतो.ही बाब बऱ्याच तरुणांना माहित आहे. तरीही तरुणांसाठी मोबाईल एक व्यसन बनला आहे. एकदा व्यसन लागली की सुटत नाही. बाईक चालवताना देखील कानाला मोबाईल लागलेला असतो. तरुणाई मोबाईलमध्ये इतकी गुंग झाली असते की, अवतीभवती काय घडत आहे. आपण कोणत्या जागी आहोत, याचेदेखील भान राहत नाही. आभासी जीवनात आपण वास्तविक जीवनापासून दूर होत आहोत. याची जाणिवही त्यांना राहत नाही. सकाळची मॉर्निंग वॉकसुद्धा कानाला मोबाईल चिपकलेला असल्याशिवाय पूर्ण होत नाही. हल्ली कानाला हेडफोन लावून वार्तालाप करताना बरीच मंडळी दिसून येतात. आजची पिढी या यंत्रात इतकी गुंतली आहे की, कळते, पण वळत नाही. इतका मोबाईल अंगवळणी झाला आहे की आपल्या बाजूला काय चालू आहे याचे भान राहिले नाही.