
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा. सरकारकडून स्वच्छ भारत मिशन अभियान राबविले जात असून त्यासाठी शासनाकडून भरपूर निधी दिला जातो परंतू मंठा तालुक्यातील ग्रामीणभागात या अभियानाचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे. बहुतांश गावात उघड्यावर शौचवारी असल्याने पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे गावकऱ्यांमध्ये साथिच्या रोगाचा फैलाव होण्याची भीती पसरली आहे.काही गावात नाल्या असून कचऱ्याने भरलेल्या असून त्या साफ नसल्यामुळे रस्त्यावर पाणि वाहत असून रस्त्यावर वावरणे कठीण झाले असून खड्ड्यात पाणि साचल्याने डासाचे प्रमाण वाढले आहे.धूर फावारणीची आवश्यकता असून काही गावात धुरफवारणी यंत्रच उपलब्ध नाहीत. कचराकुंडी नसल्यकरणाने कचऱ्याचे ढीग रस्त्यावर जमा झाल्याचे दिसून येत आहे याचे कारण पंचायत समितीचे कर्मचारी ग्रामसेवकाची उदासीनता मुख्यालई न राहणे. महिन्यातून एकदाच खेड्यात जाणे तसेच
‘स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय निर्मितीसाठी १२ हजार रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जातो, परंतु बहुतांश लाभार्थी नागरिक
बांधलेल्या शौचालयाचा वापर न करता उघड्यावर टम्बरळ घेऊन शौचास जातात. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात दुर्गंधीयुक्त वातावरण पाहण्यास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी गुड मॉर्निंग पथक स्थापित करण्यात आले होते. मात्र, मागील दोन वर्षात हे गुड मॉर्निंग पथक तालुक्यात कुठेही दिसून आले नाही. किंवा तशा
उघड्यावर शौच करणाऱ्यावर कारवाई करण्यात आल्या नाही. यामुळे हे गुड मॉर्निंग पथक केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे. या गंभीर प्रकरणाकडे पंचायत समिती विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी ग्रामसेवक अपडाऊन कार्यप्रणालीमुळे तालुक्यात हागणदारी मुक्तीचा फज्जा उडाला आहे.