
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशन तर्फे आयोजित सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील उत्तम आठ संघांची निवड करण्यात आलेली आहे.दिनांक २ ते ५ जानेवारी २०२३ दरम्यान जळगाव येथे होणाऱ्या मिनी ओलंपिक सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी अमरावती जिल्ह्याचा महीला संघ रवाना झाला असून यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत मागील पंधरा वर्षापासून आपले वर्चस्व व दबदबा कायम करणारा अमरावती जिल्ह्याचा सॉफ्टबॉल संघ पात्र ठरलेला आहे.
या संघामध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.सदर महीला संघातील प्रिया सूर्यवंशी,सोनाली चौधरी,पल्लवी कोल्हे,गौरी जगताप,आकांशा वाघमारे,भूमिका आठवले,लोकेशा तायवाडे,साक्षी शिंदे,श्रद्धा तसरे,गौरी उतखडे,मनश्री वानखडे,पल्लवी जाधव,सलोनी तसरे,वैष्णवी गिरी,सेजल इंगळे,आचल धंदर आहे तर संघाचे प्रशिक्षक म्हणून समीर सिंग चव्हाण तर संघाचे व्यवस्थापक म्हणून प्राध्यापक सुरेंद्र सिंग चव्हाण लाभले आहेत.या संघाला स्पर्धेसाठी विजय संतान (विभागीय उपसंचालक अमरावती विभाग) तसेच विजय खोकले (जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती )प्रा.हेमंत देशमुख अध्यक्ष अमरावती जिल्हा सॉफ्टबॉल संघटना,प्रा.जी.वीकोरपे प्राचार्य शिवाजी विज्ञान महाविद्यालय डॉ.मनीष गायकवाड,डॉ.एस.डब्ल्यू.बर्डे,डॉ.सुगंध बंड,डॉ.रूपाली इंगोले,डॉ.विशाखा सावजी,पंकज गुल्हाने (अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी संघटना),संतोष सावरकर,सचिन पाटणे,संतोष इंगोले,वीरेंद्र भोसले व डॉ.सुरजसिंग येवतीकर (सचिव,अमरावती जिल्हा सॉफ्टबॉल संघटना) यांनी संघाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहे.