
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : अगदी क्षुल्लक कारणावरून कोण, कधी, कोणत्या थराला जाईल, हे सांगणे कठीण असते. तथापि परभणीत मात्र एका भावाने धारदार चाकूने निर्दयपणे सपासप वार करुन आपल्या सख्ख्या दुसऱ्या भावाचा कायमचा काटा काढला. ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ ही कधी काळी बोलली जाणारी कथनी, दुष्मनी प्रवृत्तीने कृतीत आणत सुनीलने जणू काही सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
परभणी शहरातील मराठवाडा प्लॉट शेजारील साई कॉर्नर
या वसाहतीमध्ये सतीश कोंडिबा वाघमारे हा रहात होता असे यातून निष्पन्न होत आहे. शनिवारी मध्यरात्री नंतर उशीरा सतीशचा दुसरा भाऊ सतीश हा सुनीलकडे अचानक आला होता. त्याला बघून तु येथे कशाला आला, असे रागाने ओरडून सतीशने सुनीलच्या श्रीमुखात जबरी ठोस्सा मारल्याचे समजले. त्यानंतर त्याचा पाय पकडून त्याला लोखंडी पलंगावरुन खाली फेकण्यात आले. या सर्व प्रकाराने राग अनावर आलेल्या सुनीलने तेथे असलेला काचेचा ग्लास उचलून फोडला व त्या काचेच्या तुकड्याने सतीशवर वार केले. त्याने काहीच होत नाही हे बघून सुनीलने धारदार चाकूने सपासप वार केले. एवढ्यावरही समाधान होत नाही हे बघून त्याने पुन्हा पाण्याने भरलेली कळशी उचलून सतीशच्या डोक्यात मारुन सुनीलने अखेर सतीशला यमसदनी पाठवले. केवढा हा निर्दयपणा म्हणायचा. सख्ख्या भावाला जीवे ठार मारुन त्याच्या मनाला वेदना सुध्दा झाल्या नसाव्यात असेच या साऱ्या प्रकारामुळे दिसून आले. कारण भावाची निर्दयपणे हत्या केल्यानंतर अन्यत्र कुठेही पळून न जाता सुनील हा तेथे असलेल्या लोखंडी पलंगावर तसाच झोपलेला आढळून आला.
सुमशान रात्रीची वेळ होती. त्यातच भयान अवस्थेतील हा राडा ऐकून शेजारच्या भाडेकरुनी सतीशचा भाचा रामचंद्र वाघमारे यास सतीश हा रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे सांगितले.
घटनेची खबर कळताच रामचंद्र वाघमारे हा धावत तेथे आला व त्याने सर्व परिस्थिती पाहिली. अधिक चौकशी केली असता पलंगावर झोपलेल्या सुनीलने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. त्यावेळी सतीश हा गतप्राण झाल्याचे आढळून आले.
याप्रकरणी रामचंद्र वाघमारे याने नानलपेठ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सुनील कोंडिबा वाघमारे यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरतोडे, पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याचा पुढील तपास सपोनि. सांगळे हे करीत आहेत. दरम्यान सख्खा भाऊ पक्का वैरी हेच या प्रकरणामुळे असल्याचे सिद्ध झाले आहे