
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन तर्फे आयोजित सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील उत्तम आठ संघांची निवड करण्यात आलेली आहे.दिनांक २ ते ५ जानेवारी २०२३ दरम्यान जळगाव येथे होणाऱ्या मिनी ऑलम्पिक सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी अमरावती जिल्ह्याचा पुरुष संघ रवाना झाला.या संघामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत मागील पंधरा वर्षापासून आपले वर्चस्व व दबदबा कायम करणारा अमरावती जिल्ह्याचा सॉफ्टबॉल संघ पात्र ठरलेला असून सद्या होऊ घातलेल्या महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन तर्फे आयोजित सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी कोण बाजी मारणार ह्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.
या संघामध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असून सदर पुरुष संघात अभिजीत इंगोले,सौरभ टोक्से,प्रतीक डुकरे,हर्षद जळमकर,विकी सैरीसे,निखिल कडू,अभिजीत फिरके,आशिष झिमटे,प्रणव दंडाळे,वैभव वाघमारे,मंगेश इंगोले ,निखिल देशमुख ,प्रफुल मनगटे,अंशूमन डुकरे,रोहित तराळे,उत्कर्ष खुरकटे, यांचा समावेश आहे तर संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉ.विकास येवतीकर व वैभव अर्डक हे काम पाहणार आहेत तसेच संघाचे व्यवस्थापक म्हणून प्राध्यापक चंद्रशेखर इंगोले लाभले आहेत.या संघाला स्पर्धेसाठी विजय संतान (विभागीय उपसंचालक अमरावती विभाग) तसेच विजय खोकले (जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती),प्रा.हेमंत देशमुख अध्यक्ष अमरावती जिल्हा सॉफ्टबॉल संघटना,प्रा.जी.वी.कोरपे प्राचार्य शिवाजी विज्ञान महाविद्यालय,डॉ. मनीष गायकवाड,डॉ.एस.डब्ल्यू.बर्डे,डॉ.सुगंध बंड,डॉ.रूपाली इंगोले,डॉ.विशाखा सावजी,पंकज गुल्हाने (अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी संघटना),संतोष सावरकर,सचिन पाटणे,संतोष इंगोले,वीरेंद्र भोसले,प्रा.सुरेंद्र चव्हाण व डॉ.सुरजसिंग येवतीकर (सचिव,अमरावती जिल्हा सॉफ्टबॉल संघटना) यांनी संघाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहे