दैनिक चालु वार्ता सिल्लोड प्रतिनिधी-सुशिल वडोदे
सिल्लोड : सहकारी संस्थेत अग्रेसर असलेल्या सिद्धेश्वर अर्बन बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांची निवडणूक संपन्न झाली. या बँकेच्या अध्यक्षपदी प्रभाकर पालोदकर तर उपाध्यक्ष विनोद मंडलेचा यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष इद्रिस मुलतानी, माजी जि. प. सदस्य दिलीप दाणेकर, नवनिर्वाचित संचालक मकरंद कोर्डे, खुशाल पवार, अशोक पांढरे, कुशिवर्ता बडक, शेख रऊफ, ज्ञानेश्वर काकडे, ताईबाई पवार, अनुजा कळम, संजय जाधव, उत्तम रणदिवे, अभय वाघ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


