दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
पेठवडज :-कंधार तालुक्यातील पेठवडज सर्कल म्हणजे निजाम काळातील ओळखले जाते. मतदारसंघातील स्थानिक व लोकप्रतिनिधी राजकीय पुढाऱ्याने आपल्या मतापुरतेच राजकारण केले त्यामुळे या सर्कल विकासापासून कोसो दूर आहे या सर्कलतील 22 गावातील मतदारांचे आम्हाला माय एक आणि बाप एक नको एकच तालुका एकच आमदार मिळाले तर आमच्या व गावाचा विकास होईल यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन मागील अनेक वर्षापासून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी या २२ गावातील मतदारांचे प्रश्न सोडवेत अन्यथा उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद लोकप्रतिनिधीला व प्रशासनाला जागा दाखवण्याचे वेळ येऊ नये असा गंभीर इशारा मतदारातून येत आहे
कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पेठवडज सर्कल मधील 22 गावे असून जवळपास 35 हजारापर्यंत मतदार संख्या आहे गेल्या अनेक वर्षापासून या सर्कलमधील अनेक वेळा मतदारांनी आम्हाला एकच तालुका व एकच आमदार मिळावा अशी मागणी अनेक वेळा केली आहे परंतु याकडे वारंवार प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधीतून दुर्लक्ष होत आहे त्यामुळे या सर्कलमधील अनेक गावाचा विकास खुंटला आहे या सर्कलमधील अनेक गावे ही इतिहासकालीन वारसा असलेले गावे आहेत यामध्ये पेठवडज ,कल्लाळी, गोणार, मसलगा ,मंगनाळी ,कळका यासह विविध गावे या प्रत्येक गावात निजाम कालीन इतिहास आहे परंतु या गावातील अनेक गावातील अनेक गावाच्या अनेक समस्या आहेत.त्यामध्ये रस्ता, वीज, पाणीपुरवठा ,आरोग्य, शिक्षण अशा विविध समस्या पासून गावे वंचित आहेत
पेठवडज सर्कल कंधार तालुक्यात असून जिल्हा परिषद व पंचायत समिती कंधार तालुक्यात आहे पेठवडज सर्कलमधील जिल्हा परिषद पेठवडज व गोणार हे प.स.गण आहेत. विधानसभेसाठी या सर्कलमधील २२ गावे हे मुखेड तालुक्यात येतात तर लोकसभेसाठी नांदेडमध्ये येतात या सर्कलमध्ये जि.प.प.स व विधानसभेसाठी शिवसेना, काँग्रेस, भाजपा समांतर सत्ता मिळविले तर सतत लोकसभेसाठी काँग्रेसकडेच हा मतदार संघ राहिला होता अनेकांनी या सर्कलला केवळ मतापुरते राजकारण करून सोडून दिले परंतु या सर्कलमधील गावातील समस्या काही सुटल्या नाहीत त्यामुळे मतदारही निवडणुकीच्या काळातच या मागणीचा रेटा पुढे करतात त्यामुळे या सर्कल मधील निजाम कालीन ऐतिहासिक गावे असल्यामुळे शासनाने तरी या सर्कलकडे लक्ष घालून या सर्कलला एकच तालुका व एकच आमदार मिळाला तर सर्कलचा व गावाचा विकास होईल यासाठी लोकप्रतिनिधींनी व शासनाने पुढाकार घ्यावा.
पेठवडज सर्कल मधील गोणार गण असून यामध्ये ११ गावे येतात गेल्या अनेक वर्षांपासून हे सर्कल विकासापासून कोसो दूर आहे डोंगराळ भाग असल्यामुळे रस्ते , वीज, आरोग्य या मूलभूत सुविधा पासून हे सर्कल कोसोदूर आहे आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने या सर्कलला दुर्लक्ष केले त्यामुळे या सर्कल ला एक तालुका व एक आमदार नसल्यामुळे विकास कामासाठी कुणाकडे ही दाद मागली तरी आजपर्यंत दुर्लक्ष झाले त्यामुळे या सर्कल ला एकच बाप व एकच माय मिळाले तर येथील समस्या सुटतील.सौ.मंजुषा गोणारकर
ग्रा.प.सदस्या गोणार पेठवडज सर्कल मधील असे अनेक गावे आहेत ज्या गावाला देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा निजाम काळाचा वारसा व निजाम काळात अनेकांचे बलिदान देऊनही हे पेठवडज सर्कल कंधार तालुक्यात आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी कंधार तालुक्यात आहे परंतु विधानसभा मुखेड मध्ये जोडले आहे .त्यामुळे विकास कामासाठी आमदार कडे गेले तर आमदार तुमचे गाव आमच्या तालुक्यात नाही म्हणत आहेत व कंधार तालुक्यातील आमदार ला विकास कामासाठी काही मागणी केली तर तुमचा आमदार मुखेडचा आहे असे लोकप्रतिनिधीचे उत्तर मिळत आहे त्यामुळे प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी या सर्कलच्या विकास प्रश्नाचा विचार करून एकच तालुका व एकच आमदार मिळावा अशी मागणी माधव पुनवाड सामाजिक कार्यकर्ते पेठवडज यांनी व पेठवडज सर्कल मधील सर्व जनतेनी केली आहे.


