दैनिक चालु वार्ता संभाजीनगर प्रतिनिधी-शितल रमेश पंडोरे
==========================
संभाजीनगर:- औरंगाबाद शहरातील एका चटईच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे.वाळूज औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी येथील सोहेल प्लास्टिक कंपनी या चटईच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या दोन वाहन दुर्घटनास्थळी पोहोचले आहेत. अग्निशमन दलाच्या जवाणाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून कंपनीच्या शेजारी अनेक घरे देखील आहेत . ही आग पसरू नये यासाठी अधिक प्रमाणात पाण्याचे टँकर मागवण्यात आले आहेत .भीषण आगीमुळे परिसरात धुराचे मोठ्या प्रमाणात लोट पसरले आहे. अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते .ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप समजलेलं नाही


