दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्हा परिषद स्थलांतरित मुलांचे विशेष सर्वेक्षण करण्यात आले.ज्यामध्ये जिल्हाभरातून सुमारे ४१६ मुले (शाळाबाह्य) स्थलांतरित झाली आहेत.यामध्ये चिखलदरा तहसील सर्वाधिक स्थलांतरित मुलांमध्ये आघाडीवर असून एकट्या चिखलदरा तालुक्यातून १६१ मुले स्थलांतरित झाली आहे तर १३९ बालके स्थलांतरित झाली आहेत.नुकतेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वतीने शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले.जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये सुमारे ४१६ तर इतर तालुक्यांमध्ये २०२ मुले शाळाबाह्य आढळून आली.इतर जिल्ह्यातील १४८ मुले,इतर राज्यातील ६६ मुले स्थलांतरित झाल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.
स्थलांतरित मुलांना शिक्षण विभागाने जवळच्या शाळेत दाखल केले आहे.मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात प्रशासनाला यश आले असून जिल्ह्यात ४१६ मुला-मुलींनी स्थलांतर केले आहे.त्यात २२५ मुले आणि १९१ मुलींचा समावेश आहे.मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका,अंगणवाडी सेविका,सहाय्यक विशेष सर्वेक्षणाचे काम नेमून दिले होते.असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यातील ११७ शाळांतील मुलांना नियमित करण्यात आले आहे आणि स्थलांतरित झालेल्या ३५० मुलांना शाळेत नियमित करण्यात आले आहे.सर्व स्थलांतरित मुलांना जवळच्या शाळेत दाखल करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे.
—————————————-
सरकारी कामात मजुरांची हजेरी दोनदा ऑनलाइन घेतली जाते.परंतु मेळघाटातील बहुतांश भागात नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे अशा प्रकरणांमध्ये उपस्थिती नोंदवता आली नाही.केलेल्या कामाचा पूर्ण पगार मिळत नसल्याने सरकारी कामांऐवजी खासगी कामाकडे मजुरांचा कल वाढला आहे.त्यासाठी सरकारने ही ऑफलाइन प्रक्रिया राबवावी आणि त्याची गरज आहे.यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे.
🔹 आमदार राजकुमार पटेल, मेळघाट
—————————————-
—————————————-
तहसीलप्रमाणे आकडेवारी
तहसील गेलेले आलेले
अमरावती ०० ४९
अचलपुर २३ ०५
अंजनगाव सुर्जी ३९ ०६
चांदूरबाजार ३५ २०
चांदूर रेल्वे ३१ ०६
दर्यापूर ०० ०४
भातकुली ०३ ०२
धामणगाव रेल्वे ०० ०१
धारणी ४९ ०४
मोर्शी ०३ ००
नांदगाव खंडेश्वर ०२ ०५
तीवसा २० ०८
वरुड ०० ०६
धारणी ४९ ०४
चिखलदारा १६१ ००


