दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
हाळदा :- कंधार तालुक्यातील हाळदा येथे दिनांक १९जानेवारी रोज गुरुवारी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ व भगीरथ राजा यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळा व राजमुद्रा शाखेचे अनावर करण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री.पांडुरंग भारती साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक उस्मान नगर अध्यक्ष म्हणून श्री.हनमंतराव हळदेकर यांची उपस्थिती राहणार आहे.
सायंकाळी ५.३० वाजता राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या शाखेच्या अनावरण संस्थापक अध्यक्ष श्री.सचिन पाटील इंगोले साहेब ,प्रदेशाध्यक्ष श्री .शिवप्रसाद पाटील तेलंग साहेब यांच्या हस्ते होणार आहे तरी संध्याकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध कीर्तनकार झी टॉकीज फेम ह भ प सौ आशाताई सुनील राऊत लातूरकर यांचे कीर्तन होईल. दीपप्रज्वलन माननीय श्री.मारोती थोरात साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार व डॉ प्रा मा हनुमंतराव भोपाळे साहेब प्रसिद्ध कवी लेखक व्याख्याते यांच्या हस्ते होईल उद्घाटक म्हणून सचिन पाटील शिंदे मा उपसरपंच , श्री.विजय मंदावाड मा पंचायत समिती सदस्य तर अध्यक्ष पदी श्री.साहेबराव पा. वसुरे उपसरपंच हाळदा
प्रमुख उपस्थिती
श्री.सोपानराव कदम शिवव्याख्याते श्री बळीराम पा. पवार जिल्हा उपाध्यक्ष, श्री.बालाजी चुकलवाड जिल्हाध्यक्ष माजी सैनिक संघटना, डॉ गणेश पवळे, डॉ विजय वडजे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत .तरी सर्व शिवभक्तांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान राजमुद्रा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा आयोजक शहाजी पाटील शिंदे यांनी केले आहे


