दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा न.पा.चा मालमत्ता कर वेळेवर भरा व जप्ती टाळा असे आवाहन लोहा न.पा. चे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांनी लोहा शहरातील नागरिकांना केले आहे.
लोहा नगर परिषदेच्या वतीने चालू वर्षाची २०२२-२३ ची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम लोहा न.पा.च्या वतीने युध्दपातळीवर सुरू केली असुन लोहा शहरातील नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोहा न.पा.ची मालमत्ता कर व पाणीपट्टी कर शासनाच्या आदेशानुसार वसुली मोहीम चालू असुन तेव्हा या वसुली मोहिमेला लोहा शहरातील सज्ञान नागरिकांनी सहकार्य करावे आपली घरपट्टी व पाणीपट्टी कर त्वरित भरावे.
यावेळी लोहा न.पा.च्या वतीने मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांनी ८ पथके तयार केली आहेत.
त्यांच्यावर पुढील प्रभागाची जबाबदारी सोपवली आहे.
मालमत्ता कर वार्ड क्रं.१ व ३ पथक प्रमुख श्रीहरी गंगाधर चौडेकर (पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता) क्षेत्र अधिकारी वैजनाथ शेट्टे ( लिपिक) वसुली सहाय्यक राजू सरोदे, मालमत्ता कर वार्ड क्रं. ३ व ९ पथक प्रमुख शेषेराव भिसे( क.नि. प्रे.स.) क्षेत्रीय अधिकारी नंदकुमार अंकले, वसुली सहाय्यक राजू सरोदे, मालमत्ता कर वार्ड क्रं.२,१२,१३,१४,१५ पथक प्रमुख माधव पवार (क.नि. प्रे.से. ) क्षेत्रीय वसुली अधिकारी सोमनाथ केंदे, वसुली सहाय्यक गोविंद काळे, मालमत्ता कर व गाळे भाडे वसुली वार्ड क्रं.४,५,६,१७ पथक प्रमुख उल्हास राठोड (का.अ.) क्षेत्रीय वसुली अधिकारी शंकर वाघमारे, वसुली सहाय्यक नरेंद्र गायकवाड, मालमत्ता कर वार्ड क्रं.७,८ पथक प्रमुख बजरंग जगताप ( लेखापाल) ,क्षेत्रीय वसुली अधिकारी गजानन दांगटे, वसुली सहाय्यक सतीष गालफाडे, मालमत्ता कर वार्ड क्रं. १०,११,१२,१६ पथक प्रमुख श्रद्धा पांचाळ( स्थापत्य अभियंता), क्षेत्रीय वसुली अधिकारी नंदू दाढेल, वसुली सहाय्यक रावसाहेब नळगे, पाणीपट्टी वार्ड क्रं.१ ते १७ ज्ञानेश्वर जाधव ( क.नि. प्रे.से) क्षेत्रीय वसुली अधिकारी अविनाश महाबळे, नागोराव मोरे, वसुली सहाय्यक होणाजी दाढेल, विलू पवार, विठ्ठल गव्हाणे, सवाल चव्हाण, बालाजी कदम, मधुकर वडे, अशी ८ पथकांची मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांनी नियुक्ती केली असुन त्यांना १०० टक्के वसुलीचे लक्ष दिले आहे.


