
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : ‘श्रमिक एकजूट’ या मराठी दैनिकाच्या परभणी आवृत्ती तर्फे निर्मित ‘दिनदर्शिका-२०२३’ चे प्रकाशन एक फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. कृषीभूषण तथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते कांतराव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आणि साहित्यिक तथा लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी आसाराम लोमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रकाशन पार पडले. निरनिराळे वृत्त संकलन करून ते प्रकाशित करण्यासाठी ज्या तळमळीने एकजूट दाखवली जाते, त्याच श्रमिकांच्या एकजूट रुपी वृत्तपत्राला दिनचर्येच्या भांडाराची म्हणजेच दिनदर्शिकेची अत्यंत आवश्यकता असते. किंबहुना हाती घेतलेल्या प्रत्येक कार्याची, वेळेची दिशा (कालमर्यादा) निर्देशीत करणारे भांडार असलेल्या दिनदर्शिकेची जोड अगदी महत्वपूर्ण अशीच ठरली जाते. याच दिनदर्शिकेच्या माध्यमातून निर्देशीत कालानुरूप पत्रकारांना सुध्दा आपली सर्व कामे उरकावी लागतात आणि म्हणूनच या दिनदर्शिकेला समाजात सर्वत्र अधिक महत्व प्राप्त झालेले आहे. प्रत्येक घर, बंगला, कार्यालये, दुकाने, कंपन्या किंबहुना चार चाकी वाहनांमधून ही याला अग्रीम स्थानी मान दिला जातो. पर्यावरण, संगोपन, संरक्षण, वाहतूक नियम आणि कोरोनासारख्या महाकाय बिमारीचा बिमोड व्हावा यासाठीच्या जनजागृतीचा वसा जसा जोपासला किंबहुना लोकांची तीच गरज ओळखून दिनदर्शिका प्रकाशनाचा वसा सुध्दा श्रमिक एकजूट या दैनिकाने मागील १३ वर्षांपासून जोपासला आहे. त्यात कोणतेही खंड न पडू देता सातत्य जपले आहे.
प्रारंभी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा साहित्यिक व पत्रकार आसाराम लोमटे यांना ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक चालू वार्ताचे परभणी उपसंपादक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना सामाजिक कार्यकर्ते प्रताप देशमुख यांच्या हस्ते तर कृषीभूषण कांतराव देशमुख यांना पत्रकार सुरेश नाईकवाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
श्रमिक एकजूट परभणी आवृत्ती प्रमुख राजकुमार हट्टेकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात कार्यक्रमाची भूमिका विषद केली. त्यानंतर उपस्थित मान्यवर पाहुण्यांनी शॉर्ट बट स्वीट असे थोडक्यात पण मुद्देसूद विचार प्रगट करीत श्रमिक एकजूट व राजकुमार हट्टेकर यांना आशिष देत त्यांचे अभिनंदनही केले.
श्रमिक एकजूट परभणी आवृत्ती कार्यालयातील या उपक्रमास दि. फ. लोंढे, मनोहर गवारे, शेख शब्बीर, विजय गायकवाड, प्रताप देशमुख, माऊली जाधव, गंगाधर जाधव, विनोद भोसले, शेख रहिम, भगीरथ बद्दर, पत्रकार सुरेश नाईकवाडे, लक्ष्मण मानोलीकर, लक्ष्मीकांत बनसोडे, प्रभू दिपके, बाळासाहेब शिंदे, माणिक शिंदे, धनाजी चव्हाण, दत्तात्रय कराळे, विठ्ठलराव वडकुते, अनील दाभाडकर, सुधाकर श्रीखंडे, प्रमोद बल्लाळ, सुनील सुतारे, रमाकांत कुळकर्णी, प्रेस फोटोग्राफर संजय घनसावंत, श्रीकांत कुळकर्णी, विजय कदम आदींची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ॲड. सुनील कोकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार रमाकांत कुळकर्णी यांनी व्यक्त केले. यावेळी परभणीतील सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.