
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :-कंधार तालुक्यातील पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात
अनेक वर्षांपासून काॅपी सेंटर सुरू असून नांदेड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी हजारो रुपये देऊन पानभोसी येथेच अँडमिशन घेतात याचे कारण येथील शाळेत खुलेआम काॅप्या पुरविल्या जातात.त्यामुळे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत आणि पुढील अनेक पिढ्या बिनकामाच्या तयार होत आहेत बरबाद होत आहेत.गावातील लोकांनी या काॅपी सेंटरला अनेक वेळा विरोध केला आहे.परंतु शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करून पाकीट घेऊन निघून जात आहे. आणि संपूर्ण नांदेड जिल्हात काॅपीमुक्ती अभियान राबविले जात आहे.चिरीमिरी घेऊन काॅप्या चालू ठेवू नका अन्यथा उपोषणाला बसावे लागेल असा इशारा दैनिक चालु वार्ता कंधार तालुका पत्रकार बाजीराव गायकवाड यांनी बारावी परीक्षा मंडळ लातूर यांना दैनिक चालु वार्ता पेपरच्या माध्यमातून इशारा दिला आहे .सगळीकडे काॅपीमुक्ती अभियान सुरू आहे फक्त पानभोसी येथेच काॅपीमुक्ती अभियान का राबविण्यात येत नाही.शिक्षण संचालक साहेब कंधार तालुक्यातील असल्यामुळे त्यांनी या काॅपीसेंटरकडे लक्ष घालून येथील काॅपीसेंटर बंद करून हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कंधार तालुक्यातील सर्व जनतेनी केली आहे.यासाठी पानभोसी येथील नागरिकांचे सहकार्य असणार आहे.सर्वासाठी नियम सारखे असावेत एकाला एक आणि दुसरीकडे एक असे व्हायला नको असे आवाहन समस्त पालकांनी केले आहे.