
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी – जब्बार मुलाणी
—————————————-
कोथरुड पोलीस ठाणे, गु.र.नं. १३१ / २०२२, भा.द.वि. कलम ३७९ मधील चोरीस गेलेले इटींगा वाहन क्रमांक एम एच १२ पी एन ७५२७ हिचा व अज्ञात चोरट्याचा कोथरुड पोलीस ठाणेकडील तपास पथकामार्फत शोध घेत असताना, इसम नामे विवेक मिश्रा, ता.महेर, जि. सतना, मध्य प्रदेश याचेवर सदर वाहन चोरीचा संशय असल्याने सदर इसमाबाबत गोपनीय माहिती घेण्यात आली. मात्र सदर व्यक्ती ही मयत असलेबाबत त्याचे नातेवाईक इतर मित्र परिवार तसेच स्थानिक वर्तमानपत्रा मधुन माहिती मिळाली.
सदर माहितीची शहानिशा करणेसाठी गोपनीय खबरदारामार्फत ता.महैर, जि. सतना, मध्य प्रदेश येथे जाऊन तपास केला असता सदर संशईत इसम जिवंत असल्याचे व तो सदर चोरीचे वाहन हे तीचा क्रमांक बदलुन वापरत असल्याचे समजले. सदर इसमावर पाळत ठेवत असताना, तो चोरीचे वाहन घेऊन कोथरुड, पुणे येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे पोउपनिरी. माळी, पोलीस अंमलदार, चौधर व दहिभाते यांनी सापळा रचुन नमुद आरोपीस चोरीच्या चार चाकी वाहनासह ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपीस चोरीच्या वाहनासह कोथरुड पोलीस ठाणे येथे आणुन त्याचेकडे सखोल तपास करता, त्याने पौड पोलीस ठाणे, पुणे ग्रामिण गु.र.नं. २९५/२०२१. भा.द.वि. कलम ३७९ मधील अॅक्टीव्हा चोरल्याचे कबुल केले आहे.
अशाप्रकारे स्वतःचेच मृत्युचा बनाव करुन वावरणा-या वाहन चोरास चोरीच्या वाहनांसह कोथरुड पोलीसांनी अटक केली असुन वाहन चोरीचे एकुण ०२ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ३, पुणे, श्री. सुहेल शर्मा, मा. सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग श्रीमती रुक्मिणी गलंडे यांचे मार्गदर्शनाखाली कोथरूड पो स्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), बाळासाहेब बडे, पोउपनिरी माळी, पोलीस अंमलदार, चौधर, सुळ, शिर्के, राठोड, वाल्मिकी, दहिभाते, शेळके व राऊत यांनी केलेली आहे.