
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड – गोविंद पवार
लोहा शहरातील शिव छत्रपती माध्यमिक विद्यालय जुना लोहा येथे दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता कै. सुभाष सावकार सुर्यवंशी यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रतील सुप्रसिद्ध किर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) यांच्या भव्य दिव्य हरिकिर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या किर्तन स्थळाची पाहणी दि. १ फेब्रुवारी रोजी लोहा न. पा. चे नगराध्यक्ष गजानन सुभाषराव सुर्यवंशी ( सावकार) यांनी करुन समाधान व्यक्त केले. यावेळी नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक नबीसाब शेख, केतन खिल्लारे, संजय चव्हाण, बालाजी पाटील आईनवाडीकर, कार्यक्रमाचे आयोजक तथा म. रा. मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष केशव पाटील पवार, पत्रकार उपस्थित होते.
बाळासाहेब कतुरे, अंकुश पाटील पवार, नवनाथ पाटील पवार, व्यंकट दांगटे, मारुती दांगटे, गुलाम मामा शेख, विनय चंदेवाड, गोविंद वड, राजू नाकेलकर, लकी फुलवरे, नामानंद रामेजवार आदींची उपस्थिती होती.