
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
जर १९ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान लोह्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला नाहीतर तर दि. २६ फेब्रुवारी २०२३ पासून लोहा शहर बेमुदतपणे बंद करून सर्वांना सोबत घेऊन लोहा न.पा .वर प्रचंड मोर्चा काढणार असे प्रतिपादन शिवा जनशक्ती पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे सर यांनी लोहा येथील व्यंकटेश गार्डन येथे शिवा संघटनेचे प्रा.मनोहर धोंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात केले.
लोहा येथील व्यंकटेश गार्डन येथे दि. २ फेब्रुवारी रोजी शिवा जनशक्ती पार्टी चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त शिवा संघटनेच्या वतीने भव्य अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव महाराज धुळगुंडे होते तर प्रमुख उपस्थिती गुरुराज महाराज स्वामी ,सिने अभिनेते अनिल मोरे, लोहा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद पाटील पवार, कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजी पांडागळे, जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास महाराज गिते, धर्मवीर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोरे, शिवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वैजेनाथ अण्णा तोंडसुरे, सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर,इंजि. अनिल माळगे, ताकबिडे, भाजपचे माजी उपाध्यक्ष नागनाथ पाटील चुडावकर, माजी नगरसेवक उत्तम महाबळे,पंकज परिहार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त त्यांचा अनेक मान्यवरांनी हजारों कार्यकत्यांनी शाल पुष्पहार घालून पेढे भरवून फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून भव्य सत्कार केला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पुढे बोलताना प्रा. मनोहर धोंडे सर म्हणाले की,
शिवा संघटनेला धक्काही न लागू देता शिवा जनशक्ती पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना लातूर येथे शिवा संघटनेच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त दि. २८ जानेवारी रोजी केली. यात सर्व आठरा पगड जाती धर्मांचे लोक आहेत . दि. २१ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील मंत्रालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात शिवा जनशक्ती पार्टी ची राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल यात राज्यातील १६ओबीसी संघटनेची बैठक घेणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला आहे . महाराष्ट्र भर व पाच राज्यात पक्षाची बांधणी करणार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संपुर्ण महाराष्ट्रभर लढविणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताचे मुल्यमापन करायचे पूर्वी राजा हा मायच्या पोटातून येत होता आता मतदानातून होतो.
जिल्हा परिषद, पंचायत समिती नंतर लोकसभा निवडणूक आहे व लोकसभा निवडणुकीत नाक कुठे दाबायचे आहे ते माहीत आहे त्यानंतर विधानसभा निवडणुक आहे. विधानसभा निवडणुकीत जर कुण्या राजकीय पक्षाने सन्मानाने युती करण्यासाठी आले तर त्यांचा विचार करुत .
२०२४ ची लोहा विधानसभेची निवडणूक संपुर्ण ताकतीने लढविणार.
सोलापूर, लातूर, हिंगोली सह चार लोकसभा निवडणुका शिवा जनशक्ती पार्टी पक्षाच्या वतीने लढविण्यात येतील .
महाराष्ट्रात व लोहा मतदार संघात गलिच्छ राजकारण आहे येथे या राजकारणाचा महामेरू बदल करायचा आहे.
लोहयातील लोकांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविलेला पाहिजे पण येथे दाजी भावजीचा श्रेयवाद लाटण्याचे काम होत आहे या दोघांनाही वरचा मजला नाही . लोहा शहरातून बाॅयपास टू बाॅयपास रस्ता जातो तेव्हा न.पा.ने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रिंगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला असता पण दाजी – भावजीना अकल नाही. शरद पाटील पवार तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी दि. ६ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करीत आहात तशी तुम्हाला नोटीस आली आहे पण तुम्ही आमरण उपोषण करू नका साखळी उपोषण किंवा मोर्चा काढा . छत्रपती शिवाजी महाराज ही काही कुणाची एकाची जहागिरी नाही छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत आहेत आमचा सर्वाचा अभिमान आहे.
आता अतितटीची लढाई आहे शरद पाटील पवार आम्ही तुमच्या सोबत आहोत . छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.
जर दि. १९ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा न.पा.ने बसविला नाहीतर दि. २६ फेब्रुवारी पासून सर्वांना सोबत घेऊन लोहा शहर बेमुदत बंद करून न.पा. वर प्रचंड मोर्चा काढण्यात येईल असे प्रा. मनोहर धोंडे सर म्हणाले.
यावेळी लोहा – कंधार, नांदेड, लातूर , जालना, औरंगाबाद सह संपुर्ण राज्यांतील शिवा संघटनेचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंजि . अनिल माळगे, शिवा व्यापारी आघाडीचे गणेश घोडके, शिवा संघटनेचे लोहा तालुका अध्यक्ष हनुमंत भाऊ लांडगे, कालीदास मुस्तापुरे, मनोज शेलगावकर, उपाध्यक्ष साधू पाटील वडजे, सरपंच कैलास धोंडे, शिवा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम भाऊ घोडके, सुर्या आणेराव, राजकुमार पिलोळे सह शिवा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.