
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी -माधव गोटमवाड
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये पुर्ण
शिक्षण मिळवून देणारे ग्रामीण शिक्षण मंडळ .
@@@@@@@@@@@@@@@@@@@
कंधार —येथून जवळच असलेल्या नेहरूनगर नागलगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामीण शिक्षण मंडळ नेहरूनगर च्या वतीने भव्य दिव्य वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्मेल नाचे अध्यक्ष ग्रामीण शिक्षण मंडळाचे संस्थापक डॉ. संजय जी पवार व सौ संगीता पवार मॅडम तसेच प्रमुख उद्घाटक उत्तम चव्हाण मा.पंचायत समिती सदस्य सुंदर सिंग जाधव ,न ईमशेख सरपंच मधुकर चव्हाण, नागलगाव व प्रसिद्ध पत्रकार श्रीराम फाजगे
दैनिक लोकपत्र कंधार शहर प्रतिनिधी यांच्या हस्ते झाले.
वार्षिक स्नेहसंमेलनाचा आस्वाद या भागातील वाडी तांड्यासह नागलगाव येथील बालका पासून आबालवृद्धांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमात ग्रामीण शिक्षण मंडळाचे माध्यमिक आश्रम शाळा ,मूकबधिर ,प्राथमिक शाळा सर्व विद्यार्थ्यांनी लेक्षवेधक व चित्त थरारक , सुंदर सादरीकरण करत एखाद्या भव्य आर्केस्ट्राला लाजवेल असे सादरीकरण करून कार्यक्रमाच्या शेवटी पर्यंत प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला व यामध्ये विशेष गीत बंजारा गीताने तर धमाल करत ग्रामीण संस्कृतीचे दर्शन सर्वांना करून दिलं व या शाळेतील विद्यार्थिनी अतिशय सुंदर नृत्य करत गीत साजरीकरण केले सर्वच बालकलाकारांनी प्रेक्षकांचे मने जिंकले
या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक व मार्गदर्शक माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक पि.यू. पवार सर, पर्यवेक्षक बी एस चव्हाण मूकबधिर चे मोहजकर सर,शेख एम.ए. जनार्दन केंद्रे ,प्रा.फड सर,प्रा.वाघमारे,प्रा. बिराजदार,खुडेसर,उगिलेसर, सर्व शिक्षक बांधव शिक्षिका,व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्र संचालन सौ. वळसंगीकर मॅडम व प्रा. बिराजदार सर यांनी केले.