
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी माधव गोटमवाड
बालाघाटाच्या डोंगरात वसलेल्या मात्र
गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणाऱ्या जि.प.प्रा.शाळा दगड सांगवी व कदमाचीवाडी.
******************************************
कंधार –
येंथुन जवळच असलेल्या मौजे दगडसांगवी येथिल जि.प.प्रा.शाळा व कदमाचीवाडी येथील जि.प.शाळा
यांच्या संयुक्त विद्यमाने कदमाचीवाडी येथे भव्य व सुंदर शिक्षण परीक्षद संपन्न झाली.या शिक्षण परीक्षद
निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यामध्ये पहिली ते चौथी विद्यार्थ्यांनी अनेक देशभक्ती पर गाण्यावर सुंदर नृत्य करुन प्रेषकांची
मने जिंकली.चिमुकल्यांच्या पाऊल थिबकताच
उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
बालाघाटाच्या डोंगरात वसलेल्या गावला यायला साधा रस्ता नसलेल्या मात्र शिक्षणात व गुणवत्तेत एखाद्या शहातल्या नामांकित शाळेला ही लाजवेल
अशी गुणवत्ता पॅटर्न या माळरानावर निर्माण करण्याचं काम या कदमाचीवाडीच्या शाळेचा कायापालट करणारे योद्धे जाधव सर व त्यांना साथ मिळाली राठोड सर, तसेच दगड सांगवी जि.प.प्रा.शाळेची गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणारे कर्तव्य दक्ष मुख्याध्यापक मन्मथ पाटील सर,व तंत्रज्ञानाचे गाढे अभ्यासक श्री मारोती मरशिवने सर,व केंद्रे
या शिक्षण परीषद सुंदर पार पडावी म्हणून शिक्षण प्रेमी प्रकाश कदम ग्रामपंचायत प्रमुख मार्गदर्शक
तशेंच सरपंच प्रतिनिधी राघोबा कदम, उपसरपंच विठ्ठल येंडाळे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शा शिक्षण समितीचे अध्यक्ष
शिवाजी राव फाजगे, कदमाचीवाडीचे अध्यक्ष रामेश्वर
लोमटे प्रमुख उपस्थिती दगडसांगवीचे सरपंच प्रदीप बालासाहेब फाजगे, तंटामुक्ती अध्यक्ष हरीदास कदम
. गटशिक्षणाधिकारी सतीष व्यव्हारे केंद्र प्रमुख भास्कर होनराव, केंद्रीय मुख्याध्यापक धुळगंडे, जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मोहन फाजगे सर, भिमराव तोरणे,घैणाजी कल्हाळे,
कैलास कदम, उपाध्यक्ष शा.शि.स.भरत रेंगाळते पो.पा., उध्दव रेंगाळते, गोविंद कदम, नामदेव कदम,
या कार्यक्रमाला सहकार्य गावातील सर्व शिक्षण प्रेमी नागरीक ,पालक , महिला, तसेच माळेगांव केंद्रातील
सर्व मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक , पत्रकार श्रीराम फाजगे यांनी केले तर मार्ग दर्शन प्राचार्य मोहन फाजगे यांनी केले.
तसेच शिक्षकांना नविन किटची माहिती तसेच मार्ग दर्शन, केंद्र प्रमुख होनराव व केंद्रीय मुख्याध्यापक धुळगंडे, तंत्र शिक्षक मारोती मरशिवने सर.यांनी पाठ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मन्मथ पाटीलसर
व विनोद जाधव सर यांनी केले.
प्रतिक्रिया – प्रकाश कदम शिक्षण प्रेमी
आमची शाळा जरी माळरानावर असली तरी या शाळेतले बालक अतिशय बोलके सुसंस्कार देणार
घडवण्याचं काम येथील शिक्षक करत आहेत.