
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
चेन्नई :- ०५/०२/२३ रोजी चेन्नई येथे जवाहर लाल नेहरू स्टेडियम मध्ये आयोजित अपोलो संस्थापक दिनाच्या समारंभात डॉ चंद्रकांत रावसाहेब टरके यांना “यंग क्लिनीशियन अवॉर्ड 2022” ने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट वैद्यकीय सेवेबद्दल ऑल इंडिया अपोलो ग्रुपमधील मधील चिकित्सकांमधून त्यांची निवड करण्यात आली. त्यांना हा पुरस्कार श्रीमती सुनीता रेड्डी, मॅनेजिंग डायरेक्टर अपोलो हॉस्पिटल ग्रुप, यांच्या हस्ते अपोलो हॉस्पिटल चेयरमन डॉ प्रताप सी रेड्डी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. डॉ टरके हे मुळचे किवळा ता.लोहा जि.नांदेड येथील असून सध्या अपोलो हॉस्पिटल हैदराबाद येथे सिनियर कन्सलटंट व चेअरमन इंडियन चेस्ट सोसायटी (दक्षिण भारत) या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाचे वैद्यकीय, सामाजिक, राजकीय क्षेत्रातुन कौतुक होत आहे.